Raju Shetti, Eknath Shinde, devendra fadnavis, Maharashtra Budget 2023 Saam TV
महाराष्ट्र

Raju Shetti : हे तर 'चाट मसाल्याचं बजेट'; अर्थसंकल्पावर राजू शेट्टी नाराज

राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सरकारनं सादर केल्यानंतर विविध नेते त्यावर नाराजी व्यक्त करु लागले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Budget : यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे 'खोली कमी आणि उथळपणा जास्त' असंच वर्णन या अर्थसंकलपाचे करावे लागेल अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली. आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सभागृहात राज्याचा अर्थसंकलप (Maharashtra Budget 2023) सादर केला. त्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी अर्थसंकल्पाविषयी नाराजीचा सूर आवळला.

राजू शेट्टी म्हणाले राज्य सरकारच बजेट म्हणजे 'चाट मसाल्याचं बजेट आहे' . ...तेवढ्यापुरतं चविष्ट लागतं. मात्र अंतिमतः हाताला काही लागत नाही अशी स्थिती या बजेटची आहे. 6 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, रासायनिक खतांमध्ये तब्बल १७ ते १८ हजार रुपयांची वाढ झालीय. याकडे लक्ष न देता आमचे अर्थमंत्र्यांनी आम्हाला केवळ ६ हजार रुपये देत आहेत. म्हणजे अजून १० हजारांनी शेतकरी तोट्यातच गेला आहे. (Maharashtra News)

२०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्ज योजनेतील राहिलेले शेतकरी आहेत. त्यांची स्थिती 'ना घर का ना घाट का' अशी झाली होती. या उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी १५ हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय हा स्वागतार्ह आहे.

शेट्टी म्हणाले या वरवरच्या गोष्टी आहेत. या बजेटमध्ये शेतीमाल साठवणुकीसाठी गोडाऊन अनुदान योजनांची घोषणा झाली नाही. निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची घोषणाही झालेली नाही. प्रक्रिया उदयोगाला चालना देण्याकडे अर्थमंत्र्यांचे दुर्लक्ष झालेलं आहे. जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण होण्यासाठी सोलर फेन्सिंग विशेष अनुदानाची योजना सरकारने राबवणे गरजेचे होते. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलंय असंही राजू शेट्टी म्हणालेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

SCROLL FOR NEXT