INDIA’S LONGEST RAJDHANI EXPRESS: 42-HOUR JOURNEY ACROSS 7 STATES Saam Tv
महाराष्ट्र

Rajdhani Express : ४२ तासात २८४३ किमीचा प्रवास; कुठून ते कुठंपर्यंत धावते भारतातील सर्वात लांब एक्स्प्रेस

Indian Railway Rajdhani Express : भारताची सर्वात लांब राजधानी एक्सप्रेस तिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन पर्यंत २,८४३ किमीचा ४२ तासांचा प्रवास करते. यादरम्यान प्रवाशांना तब्बल ७ राज्यांमधून प्रवासाचा अनुभव आणि प्रीमियम सुविधा घेता येणार आहे.

Alisha Khedekar

  • तिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन ही भारतातील सर्वात लांब राजधानी एक्सप्रेस आहे

  • सुमारे २,८४३ किमी अंतर ४२ तासांत पूर्ण करते

  • ७ राज्यांमधून प्रवास करत भारताची विविधता दाखवते

  • प्रीमियम सुविधा, वेग आणि आरामामुळे प्रवाशांची पसंती

भारतीय रेल्वेच्या प्रीमियम आणि वेगवान गाड्यांमध्ये ‘राजधानी एक्सप्रेस’ला विशेष स्थान आहे. देशाच्या राजधानीला विविध राज्यांशी जोडणाऱ्या या गाड्या केवळ वेगासाठीच नव्हे, तर आरामदायी सुविधांसाठीही ओळखल्या जातात. तिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस अशाच राजधानी गाड्यांमधील एक असून ही गाडी तिच्या प्रदीर्घ प्रवासामुळे विशेष चर्चेत असते.

लांब पल्ल्याची राजधानी एक्सप्रेस ही नवी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून सुटते, आणि ही गाडी केरळची राजधानी तिरुवनंतपुरम सेंट्रलपर्यंत सुमारे २,८४३ किलोमीटरचा प्रवास करते. या संपूर्ण प्रवासाला जवळपास ४२ तास लागतात, म्हणजेच प्रवाशांना तब्बल दोन दिवस रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळतो.

या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी भारताच्या विविध राज्यांना एकाच मार्गावर जोडते. उत्तर भारतातून सुरू होणारी ही रेल्वे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि शेवटी केरळ या सात राज्यांमधून धावते. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि निसर्गाचा अनुभव या एका प्रवासात घेता येतो.

इंडिया रेल इन्फोच्या माहितीनुसार, ही ट्रेन सकाळी ६:१६ वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकावरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११:३५ वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचते. या दरम्यान ती अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबते. राजधानी एक्सप्रेस असल्यामुळे या गाडीला भारतीय रेल्वेमध्ये प्राधान्य दिले जाते. आरामदायी आसनव्यवस्था, जेवण, वेळेचे बंधन या सगळ्यामुळे ही गाडी प्रवाशांची पहिली पसंती ठरते. एकंदरीत, तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही केवळ एक रेल्वेगाडी नसून भारताच्या विविधतेला जोडणारा एक जिवंत दुवा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिवंडीत ठाणे महानगर PNG गॅसची पाईपलाइन फुटली

Raigad : रायगड हादरले! आईने ४ मुलांना विष पाजून स्वतःही संपवलं आयुष्य; नेमकं झालं काय?

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Shocking : भयंकर! जन्मदात्या बापाने १९ वर्षीय मुलीची पोलीस ठाण्यात केली निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

Accident : राजनाथ सिंह यांच्या कुटुंबावर शोककळा; पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT