एसीबीकडून (anti corruption bureau) माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने नाेंदविला गेला आहे. मला न्याय मिळावा यासाठी मी उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयात जाणार असल्याची भावना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आमदार राजन साळवी (mla rajan salvi) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयात राजन साळवी यांच्या कुटुंबाला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना एसीबीच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. (Maharashtra News)
आमदार राजन साळवी म्हणाले मी राजकारणामध्ये असताना माझ्यावरती आरोप करणे हे मी समजू शकतो. परंतु कुटुंबीयांवरती गुन्हा दाखल करणे ही दुर्देवाची बाब आहे. रत्नागिरी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे.
सत्यमेव जयते असे म्हणत साळवी यांनी न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. एका व्यक्तीने दिलेल्या अर्जावरून माझ्यावर कारवाई झाली. अर्ज आल्यानंतर त्याची खातर जमा करणे आवश्यक हाेते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले एखाद्या व्यक्तीच्या अर्जावरून माझ्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे योग्य नाही. माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने नाेंदविला गेला आहे. माझ्यावरती झालेल्या चुकीच्या कारवाईबाबत मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाणार आहे.
विनायक राऊत खासदारकीची हॅट्रिक हाेणारच
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे असेही एका प्रश्नाला उत्तर देताना साळवींनी स्पष्ट केले. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विनायक राऊत (vinayak raut) पुन्हा एकदा हॅट्रिक करतील असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभा निवडणुकीत (lok sabha election 2024) नारायण राणे (narayan rane) किंवा त्यांचे पुत्र असू दे अथवा शिंदे गटाचे उमेदवार असू दे विजया आमचाच आहे असेही राजन साळवींनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.