राजे रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रात परतली
तलवार लंडनमधून राज्य सरकारकडे हस्तांतरित
सरकारने ४७.१५ लाख रुपयांत तलवार विकत घेतली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्यानंतर आणखी एक मराठा वारसा महाराष्ट्रात येणार आहे.
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. ही तलवार लंडनमधून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आलीय. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे ही तलवार सुपूर्त करण्यात आलीय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनख्यानंतर आता मराठा साम्राज्यातील आणखी एक मौलिक ठेव महाराष्ट्रात येणार आहे.
राजे रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकली असून. आज महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्त करण्यात आलीय. सरकारने ही तलवार एका मध्यस्थामार्फत जवळपास ४७.१५ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. १६ ऑगस्टपर्यंत राजे रघुजी भोसलेंची ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे. या तलवारबाबची माहिती मंत्री अशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून दिलीय.
आनंदाचा क्षण, तलवार आपल्या ताब्यात आली!
तमाम महाराष्ट्राला सांगताना मला अत्यंत आनंद होतोय की, नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले. यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे सरकारच्यावतीने ताब्यात घेतलीय. आम्ही ती महाराष्ट्रात घेऊन येणार आहोत. लवकरच महाराष्ट्रातील जनतेला पाहण्यासाठी ती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव जिंकण्यापासून ते ती ताब्यात घेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन आणि भूमिका असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, लंडन येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार!
रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांच्या युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी १७४५ च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व केल होतं.
मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत त्यांनी विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे या तलवारीचे वैशिष्ट्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.