Raj Thackeray, Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे १९ वर्षांनतर एकाच स्टेजवर आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कोनाकोपर्यातून कार्यकर्ते आले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यापुढेही आपण एकत्र राहणार असल्याचे सांगत शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिलेच. यावेळी बोलताना ठाकरे बंधूंनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. ठाकरे शैलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरेंनाही आम्हाला एकत्र आणायला जमलं नाही, ते देवेंद्र पडणवीस यांना शक्य झालं, असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी फडणवीस यांना लगावला. तर आपल्याला हे वेगळं करायला पाहतील, पण आपण वेगळं व्हायला एकत्र आलो नाही, असे उद्धव ठाकरे यांनी खणखणीत सांगितले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. हिंदी सक्तीवरून दोन्ही ठाकरेंनी फडणवीस सरकारवर ठाकरे शैलीत टीकेचे बाण सोडले. त्याशिवाय दोन्ही ठाकरेंकडून युतीचे संकेत देण्यात आले. यावेळी मराठीसाठी आम्ही कायमच एकत्र असल्याचेही सांगितले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीसांना काय इशारा दिला, पाहूयात...
जे बाळासाहेबांना आणि इतर कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असा टोला राज ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. तुमच्याकडे विधानसभेत सत्ता आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे, असा इशाराही यावेळी राज ठाकरेंनी दिला.
आमच्यातला आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला.
एकत्र आलोत, एकत्र राहण्यासाठी असेही त्यांनी सांगितले. फक्त मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत, असेही ठाकरे म्हणाले.
भाषेवरून विषय वरवरचा निघून चालणार नाही. मधल्या काळात यांनी वापरून फेकून दिलं. आता आम्ही दोघे वापरणार आणि फेकणार, असा इशारा फडणवीसांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.