अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
Minor Girl Molested in Moving Auto : अकोला शहरात एक धक्कादायक प्रकार घडलाय. काल सायंकाळी एका अल्पवयीन मुलीचा ऑटो रिक्षा चालकाने विनयभंग केलाय. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबत मुलीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. दरम्यान, पीडित मुलगी अकोला मध्यवर्ती बस स्थानकापासून रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटकेसाठी तिने प्रतिकार केला. मात्र, रिक्षा चालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतलाय. त्यानंतर रिक्षातून तिने पळ काढला. या संपूर्ण प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी ऑटो चालकाला अटक करीत त्याच्यावर गुन्हे दाखल केले. जाफर खान सुभेदार खान (रा.बकेट कारखान्या जवळ शहनवाजपुरा, नयेगाव, अकोला.) असं अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक 16 वर्षीय विद्यार्थिनी ही अकोला शहरात नीटचे क्लासेस करीत आहे. त्यासाठी तिने राहायला खोली देखील भाड्याने केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी होती. त्यामुळे परतवाडा येथे गावी गेली होती. काल दुपारी बसने अकोल्याकडे रवाना झाली. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ती बसस्थानकावर पोचली. त्यानंतर रूमवर जाण्यासाठी एक ऑटो रिक्षा बघितला. आणि त्यामध्ये बसून रूमकडं रवाना झाली. मात्र ऑटो रिक्षा चालकाने ऑटो वेगळ्याच रस्त्यावर नेला, तिला संशय आला. तिने मित्राला फोनवर सांगितलं. दरम्यान, अगदी थोड्या वेळातच चालत्या रिक्षात चालकाने मुलीचा हात पकडून स्वतःजवळ ओढत तिचा विनयभंग केलाय. पीडित मुलीने प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या डाव्या हातावर आणि हाताच्या दंडाला चावा घेतला.
थोड्या वेळातच तिने सुटका करत ऑटोमधून पळ काढला. लागलीच पीडिता सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाली, आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. विशेष म्हणजे मुलीने ऑटो रिक्षा चालकाचा क्रमांक देखील नोंद केला होता. त्यामुळे पोलिसांना ऑटो चालकाचा शोध घेण्यास मोठी मदत मिळाली. कलम 74,118,(1),137 (2) BN. सहकलम 8 पोक्सोनुसार जाफर खान सुभेदार खान याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एमएच 30 ई 9497 या क्रमांकाचा ऑटो देखील ताब्यात घेतला आहे. अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस रोड ते अनोळखी ठिकाणी ही घटना घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस ठाण्यात प्रहार आणि बजरंग दलाचे दाखल झाले होते. विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी या दरम्यान करण्यात आली.
अकोला शहरात मागील अनेक दिवसांपासून अनेक घटना घडतायेत. बाहेरगावील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अकोला शहरात शिक्षणासाठी येत आहेत. मात्र त्यांच्याकडून अकोला शहरातील शहरातील सराईत गुन्हेगार खंडणी मागतात. खंडणी न दिल्याने विद्यार्थ्यांना मारहाण होते. एका विद्यार्थ्याचा नुसता पन्नास रुपयांसाठी खून झाला होता. तर एका विद्यार्थ्याने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तर काहींना मारहाण झालेली आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल आहेत, मात्र. पोलिसांकडून पाहिजे तसं वचक निर्माण होत नाहीये.
31मार्च 2023 रोजी अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच लैंगिक अत्याचार करण्यात आला. तेव्हा गुलाम रसुल शेख मतीनला अटक केली होती. एक अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे आपल्या नातेवाईकाकडे जात होते. रात्री बसस्थानकावर उशीर झाल्याने गाडी नसल्याने एका व्यक्तीने त्यांना हेरलं. रेल्वे स्टेशनवर नेतो असं सांगत आरोपी गुलाम रसुल शेख मतीन याने दोन्ही अंध पती-पत्नीला निर्जन स्थळी नेत अंध विवाहितेवर बलात्कार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.