Raj Thackeray tribute to paper leak victims : देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र अन् राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. "पेपरफुटीच्या भीषण दणक्यामुळे देशात तब्बल ३१ निष्पाप विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचा अंत केला आहे," असा धक्कादायक आकडा मांडत राज ठाकरेंनी या आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या सर्व ३१ विद्यार्थ्यांची नावे भरसभेत वाचून दाखवली. तसेच या मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही काळ मौन बाळगण्यात आले. राज ठाकरेंच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. राज ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी मुंबई पोलिसांचे खास कौतुक केले.
पेपरफुटी घोटाळा, तरुणांचा आक्रोश आणि सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरोधात दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर जनसागराचा महापूर लोटला होता. हातात राष्ट्रध्वज घेतलेल्या हजारो तरुणांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण शिवाजी पार्क परिसर ‘तिरंगा रॅली’ने अक्षरशः तुडुंब भरला होता. पाऊस असतानाही तरूणाईचा जनसागर शिवाजी पार्कावर लोटला होता. जिकडे नजर जाईल तिकडे तरूणाई दिसत होती.
‘GenZ ने आंदोलनात दाखवून दिली आपली ताकद’
NEET अन् इतर परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात पेटलेल्या या आंदोलनाचे यश अधोरेखित करताना राज ठाकरे म्हणाले, "हे आंदोलन एवढ्या तीव्रतेने पेटवल्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. तरुण पिढी (GenZ) जेव्हा रस्त्यावर उतरते, तेव्हा 'झिंज्या कशा उपटल्या जातात' हे संपूर्ण देशाने या आंदोलनात उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे." तरुण वर्गाने दाखवलेल्या या आक्रमक एकजुटीचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
दिल्ली पोलीस अन् मुंबई पोलिसांत जमीन-आस्मानचा फरक
आपल्या भाषणाचा शेवट करताना राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांचे विशेष आभार मानले आणि त्यांच्या संयमी कामगिरीचे कौतुक केले. "या संपूर्ण आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी दाखवलेली शिस्त आणि सहकार्य वाखाणण्याजोगे आहे. दिल्लीतील पोलीस आंदोलकांना कशी वागणूक देतात आणि आपले मुंबई पोलीस कसे वागतात, या दोन्हीतील फरक आज संपूर्ण देशाला स्पष्टपणे दिसला आहे," असे म्हणत त्यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.
'एका झुरळाने हुकूमशहाला नमवले...' - उद्धव ठाकरेंचा घणाघात
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज आपण कोणतीही निवडणूक जिंकलो नसलो, तरीही या देशातील अंधभक्तांच्या विरोधात देशभक्तांचा विजय झाला आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे. या लढ्यात जात, पात आणि धर्म विसरून सगळे 'भारतीय' म्हणून एकत्र आले आहेत. एका झुरळाने हुकूमशहाला नमवले आहे, हाच खरा विष्णूचा अवतार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.