Ganesh Visarjan: गणपती चालले गावाला...; मुंबई- पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

Mumbai-Pune Ganesh Visarjan: राज्यात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुका २४ तासांनंतरही सुरूच आहेत. मुंबई-पुण्यात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
Ganesh Visarjan: गणपती चालले गावाला...; मुंबई- पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी
Ganesh VisarjanSaam Tv
Published On: 
  • मुंबई-पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन सुरू

  • लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीजवळ पोहचली

  • पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक २१ तास सुरू

  • मुंबई गणपती विसर्जन पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गर्दी

गेल्या १२ दिवस गणपती बाप्पाची मनापासून पूजा आणि सेवा केल्यानंतर शुक्रवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबई आणि पुण्यात अद्यापही गणरायाचे विसर्जन सुरू आहे. मुंबई आणि पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुका २४ तासांपासून सुरू आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला असा जयघोष करत लाडक्या बाप्प्ला निरोप दिला जात आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळ करत साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी आणि शहरातील इतर प्रमुख तलावांवर अद्यापही गणपती विसर्जन सुरू आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे. चिंचपोकळीचा राजा विसर्जनासाठी गिरगावमध्ये दाखल झाला आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक ओपेरा हाऊस येथे दाखल झाली आहे. विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. काही तासांतच लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशिर होणार आहे. समुद्राला भरती असल्यामुळे विसर्जन उशिराने होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गिरगावच्या चौपाटीवर विसर्जन पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. चौपाटीवर कडोकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Ganesh Visarjan: गणपती चालले गावाला...; मुंबई- पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी
Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

दुसरीकडे पुण्यात देखील लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २१ तास पूर्ण झाले. २१ तासांपासून पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर जल्लोषात मिरवणुका सुरू आहेत. लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोड वरून अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहेत. लक्ष्मी रस्त्यावरून ढोल-ताशा पथक तर कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्त्यावरून डी जे साउंड सिस्टिमचे वादन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. अद्याप २०० हून अधिक गणपती बाप्पांचे विसर्जन होणे बाकी आहे. विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Ganesh Visarjan: गणपती चालले गावाला...; मुंबई- पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी
Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत विसर्जनाला गालबोट, विजेचा धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

गणपती विसर्जनानंतर आज जुहू चौपाटीवर सफाई मोहीम राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे, सिने अभिनेता अजय देवगण, भाजप मुंबई अध्यक्ष- आमदार अमित साटम आणि आमदार राम कदम देखील या सफाई मोहिमेत सहभागी झाले आहेत. मोठा संख्येने शाळकरी मुलांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

Ganesh Visarjan: गणपती चालले गावाला...; मुंबई- पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी
Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com