Raj Thackeray, Beed, Parli SAAM TV
महाराष्ट्र

Raj Thackeray Parli Court Updates : राज ठाकरेंना अटक की जामीन ? थाेड्याच वेळात फैसला

न्यायालय परिसरात तसेच राज ठाकरे यांच्या ताफ्यात पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त आहे.

विनोद जिरे, डॉ. माधव सावरगावे

Raj Thackeray In Parli Court : चीतावणीखोर वक्तव्याबद्दल परळी (बीड) न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले हाेते. हे वॉरंट रद्द करून जामीन मिळावा यासाठी राज ठाकरे हे आज परळी न्यायालयातील कामकाजासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान न्यायालयीन कामकाजानंतर राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील असा अंदाज बांधला जात आहे. (Maharashtra News)

राज ठाकरे यांना एका प्रकरणात सन (2008 मध्ये) मुंबईत अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. त्यावेळी बसचे नुकसान झाले होते. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणी दिल्याबद्दल मनसे (mns) प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता.

आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबाद विमानतळावर आले. तेथून वाहनाने ते परळीकडे रवाना झाले. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी परळीत युवा वर्ग रस्त्यावर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान परळी न्यायालयाच्या आवारात मनसे कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून येण्यास सुरुवात केली आहे.

काही वेळेतच राज ठाकरे हे परळीत पाेहचतील. त्यानंतर ते न्यायालयीन कामकाजासाठी परळी न्यायालयात उपस्थित राहतील अशी माहिती मनसे पदाधिका-यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीचा निकाल घोषित करु नये- औरंगाबाद खंडापीठात याचिका

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT