Eknath Shinde - Raj Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Raj Thackeray Speech : अलिबाबा आणि चाळीस जण सोडून गेले, फक्त... शिंदेंबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

Raj Thackeray On Eknath Shinde Group: उद्धव ठाकरे जिथे सभा घेतील तिथे पुन्हा सभा घेऊ नका, असा सल्लाही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raj Thackeray Speech in MNS Melava : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना फुटीनंतर घडलेल्या घडामोडींवरही भाष्य केलं आहे. अचानक अलिबाबा आणि चाळीस जण शिवसेनेतून निघून गेले. फक्त त्यांना चोर म्हणता येणार नाही. कारण तेही कंटाळून गेले, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, अलिबाबा आणि चाळीस जण शिवसेनेतून निघून गेले. शिवसेनेतील कार्यपद्धतील कंटाळून ते गेले. एकनाथ शिंदे सूरतहून गुजरातला गेले. महाराष्ट्रात सूरत लुटून आलेलं ऐकलं होतं. पण पहिल्यांदाच महाराष्ट्र लुटून सूरतला गेले, अशी टिप्पणीही राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्लाही दिला. मुख्यमंत्री शिंदेंना एकच सांगणं आहे, उद्धव ठाकरे जिथे सभा घेतील तिथे पुन्हा सभा घेत फिरु नका. ते गुंतवून ठेवतील, लोकांच्या प्रश्नांचं काय? पेन्शनचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, अवकाळीनंतर शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे, सभा कसल्या घेता, असंही एकनाथ शिंदेंना उद्देशून राज ठाकरे यांनी म्हटलं.

शिवसेना आणि धनुष्यबाणावरुन झालेला वाद पाहून वेदना झाल्या

ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण तुझं की माझं हे चालू होतं त्यावेळी प्रचंड वेदना होत होत्या. इतकी वर्ष तो पक्ष पाहत आलो, जगलो. राजकारण लहानपणापासून पाहत आलो, अनुभवत आलो. असंख्य लोकांनी कष्टाने उभी केलेली संघटनेत सुरु असलेल्या घडामोडींमुळे वाईट वाटलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT