
Raj Thackeray Speech in MNS Melava : शिवसेना फुटीवर आज राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरुन तुझं की माझं सुरु असताना प्रचंड वेदना झाल्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
अनेक जण म्हणाले मनसे संपलेला पक्ष आहे. जे बोलले त्यांची अवस्था काय आहे, तुम्हाला माहिती आहे. मात्र सध्याच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झालाय. हे सगळं राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होतं. (Political News)
मात्र ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण तुझं की माझं हे चालू होतं त्यावेळी प्रचंड वेदना होत होत्या. इतकी वर्ष तो पक्ष पाहत आलो, जगलो. राजकारण लहानपणापासून पाहत आलो, अनुभवत आलो. असंख्य लोकांनी कष्टाने उभी केलेली संघटनेत सुरु असलेल्या घडामोडींमुळे वाईट वाटलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
एकदाच सर्वांनी ठरवा आणि आताच निवडणुका लावा
राज्याच्या राजकारणात सध्या हे गेले, ते आले असं सगलं सुरु आहे. आजपर्यंत आपण अशा प्रकारचं राजकारण पाहिलं नव्हत. नवे उद्योग राज्यात येत नाहीत, बेरोजगारी वाढत चालली आहे. सर्वसामान्य सरकारकडे पाहत आहे आणि सरकार कोर्टाकडे बघत आहे, आमचं काय होणार?, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
एवढं करण्यापेक्षा एकदाच सर्वांनी ठरवा आणि आताच निवडणुका लावूया. राजकारणात जो काही सध्या चिखल झालाय, तोच लोक तोंडात घालतीय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.