Raj Thackeray Devendra Fadnavis meet SaamTV
महाराष्ट्र

सकाळी राज ठाकरे, आता उद्धव ठाकरेंचा बडा नेता CM फडणवीसांच्या भेटीला; सागर बंगल्यावर खलबतं

Raj Thackeray and Milind Narvekar Meet Chief Minister Devendra Fadnavis : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा सुरू होती.

Prashant Patil

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा चालली.

या भेटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. या भेटींच्या सत्रांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. उद्धव ठाकरे यांचे सर्वाधिक जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे आणि सुभाष देसाई हे नेते देखील फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा सुरू होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण त्यावर मनसे किंवा भाजप, यापैकी कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी मौन सोडले नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या भेटीचं गुपित विचारण्यात आलं असता, त्यांनी थेट उत्तर दिलं.

चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आणि मग तिथून मी निघालो. आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT