Raj Thackeray Uddhav Thackeray News saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा हे वाक्य लक्षात ठेवा; उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj Thackeray Uddhav Thackeray News: कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला ६ तारखेला कळेल, असं म्हणत राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झालीय.

Bharat Jadhav

महाराष्ट्रातील जनता आणि राजकरणासाठी जुलै महिन्यातील ६ तारीख महत्त्वाची ठरणार आहे. कारण यादिवशी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. जनतेच्या मनात जे आहे, तेच करणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले होते. आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिलेत.

ज्या विधानावरून जे सगळं चाललेय ते विधान तुम्हाला आठवत असेल. कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला ६ तारखेला कळेल, असं म्हणत राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झालीय.

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या ६ जुलैला सरकारच्या या निर्णयाविरोधात भव्य मोर्चाची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलीय. या मोर्चेत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसेल. त्याप्रकारचे संकेतही राज ठाकरे यांनी दिले आहेत.

दरम्यान या मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसणार आहे. केवळ मराठीचा अजेंडा असेल असं सांगत राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्ष, मराठी कलावंत, साहित्यिक यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत संकेत दिलेत. हिंदी सक्तीविरोधात करण्यात येणाऱ्या मोर्चेत उद्धव ठाकरे देखील येणार का असा सवाल काही पत्रकारांनी केला होता.

पत्रकारांच्या या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले तर तेदेखील त्यात येतात. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्या नेत्यांशी बोलणार. आमची माणसे त्यांच्या लोकांशी बोलतील. हे ज्या विधानावरून जे सगळं चाललेय ते विधान तुम्हाला आठवत असेल. कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे लक्षात ठेवा.

हे वाक्य तुम्हाला ६ तारखेला कळेल असं राज ठाकरे म्हणालेत. आपल्याला कुठल्याही भाषेचा द्वेष नाही. पण जे आंदोलन उभे राहील त्यामागे शिवसेना खंबीरपणे उभे राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे हेही मनसेच्या मोर्चेत सहभागी होतील असं म्हटलं जात आहे.

सरकारला उद्धव ठाकरेंचाही इशारा

महाराष्ट्रावर हुकूमशाही लादण्यासाठी शिवसेना संपवली हे दिसून येत आहे. कुठल्याही भाषेचा द्वेष नाही. पण जे आंदोलन उभे राहील त्यामागे शिवसेना खंबीरपणे उभे राहील. हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि तो राहणारच. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. आम्हाला हिंदीचे वावडे नाही परंतु हिंदी सक्तीमागे छुपा अजेंडा असल्याच म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय.

दरम्यान, ६ जुलैला सरकारला महाराष्ट्राची ताकद दिसेल. त्यादिवशी रविवार आहे शाळा बंद असतात. पालकांना-विद्यार्थ्यांना यायला सोपे आहे. त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही. राज्यांवर ही गोष्ट सोपवलेली नसताना राज्य सरकार हिंदी भाषा का आणतेय हे कळत नाही.

आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी सीबीएसई शाळा राज्यात सुरू झाल्या. मात्र आता या शाळा राज्यांतील शाळांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! निवडणुकांनंतर अर्जांची पडताळणी होणार

Masala Phulka Roti Recipe : मुलं रोज चपाती खाऊन कंटाळली? टिफिनला द्या हेल्दी मसाला फुलका रोटी

Maharashtra Live News Update: भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई ३ दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर

Weight Loss Tips: वजन घटवण्यासाठी ३-३-३ नियम काय आहे? जाणून घ्या 'ही' खास पद्धत

Tanushree Dutta : "उशीर होण्याआधी मदत करा, घरातच छळ होतोय"; तनुश्री दत्ताने रडत रडत केली विनंती | VIDEO

SCROLL FOR NEXT