Uddhav And Raj Thackeray Voting  
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेही परदेश दौऱ्यावर, युतीची चर्चा देशाबाहेर होणार?

Raj Thackeray Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असताना मनसे-शिवसेना युतीची चर्चा परदेशात होणार का? महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये युतीची खरेच चर्चा होणार की हा फक्त राजकीय जुमला होता?

Namdeo Kumbhar

Raj Thackeray Uddhav Thackeray alliance political News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंनी साद घातली अन् उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी महाराष्ट्रात नवे समीकरण पाहायला मिळणार का? याची चर्चा सुरू होती. सत्ताधारी आणि विरोधकांकडून याबाबत प्रतिक्रिया येत होत्या. पण आठवडाभर तर युतीच्या चर्चा होतील, असे वाटत नाही. राज ठाकरे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेही विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चा विदेशात होणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे कुटुंबासोबत विदेशात सुट्टीवर जाणार आहेत. ४ मे पर्यंत उद्धव ठाकरे विदेशातच राहणार आहेत. त्यामुळे मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर युतीच्या चर्चा होणार नाहीत, अशी चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे राज ठाकरेही सध्या विदेशातच आहेत. त्यामुळे काहींच्या मते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची बोलणी विदेशात होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना -

मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या विदेशात आहेत. इकडे महाराष्ट्रात राजकारण तापले. शिवसेना-मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू झाली. मनसे नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. राज ठाकरेंनी विदेशातून मनसे सैनिकांना आदेश दिला. अतिसंवेदनशील विषयावर कोणत्याही प्रतिक्रिया, कमेंट्स करू नका. युतीवर सध्या बोलणं टाळा.. अशा सूचना राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिल्या आहेत.

राज ठाकरे २९ एप्रिल रोजी महाराष्ट्रात परतणार आहेत. तर उद्धव ठाकरे ४ मे रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. दोन्ही नेते महाराष्ट्रात परतल्यानंतरच युतीचं भवितव्य नेमकं काय? याचा अंदाज बांधला जातोय. आतापर्यंत फक्त दोन्ही नेत्यांकडून प्रसारमाध्यमांसमोर प्रतिसाद दिलाय, दोन्ही नेत्यांमध्ये थेट बोलणी झालेली नाहीत. त्यामुळे ठाकरे बंधू युतीची बोलणी विदेशात करतात की देशात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये युतीची खरेच चर्चा होणार की हा फक्त राजकीय जुमला होता? हे थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

SCROLL FOR NEXT