How Will Raj–Uddhav Alliance impact Mumbai and Maharashtra Politics? दोन दशके लोटली. या दोन दशकात अनेक प्रयत्न झाले, पण दोघेही भाऊ सोबत येण्यास तयार झाले नाहीत. अखेर महाराष्ट्राच्या राजकारणातील कायम चर्चिली गेलेली युती आज झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते एकत्र आले आहेत. मनसे आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा दणक्यात झाली. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील मराठी माणसाची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई, महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळेल. पण, ठाकरे बंधूंच्या एकीकरणाचा भाजपला फटका बसणार का? मराठी माणसाची एकजूट करण्यात ठाकरे बंधू यशस्वी ठरणार का? उद्धव ठाकरे मुंबईचा गड राखणार का? यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेच्या भोवऱ्यात आले आहेत. याच वेगवेगळ्या शक्यतांची चाचपणी करूयात.. (What the Thackeray Brothers’ Alliance Means for Maharashtra’s Political Future)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार, यात शंकाच नाही. मुंबई महानगरपालिका (BMC), ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत याच सर्वाधिक प्रभाव दिसेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने मराठी माणूस एकवटेल, असे अनेक तज्ज्ञांकडून सांगण्यात येतेय. पण दोन्ही भावांमुळे मतांचे ध्रुवीकरण किती थांबणार? हेही तितकेच महत्त्वाचे आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मतदारांची विभागणी थांबेल असे म्हटले जातेय. शिवसेना (UBT) आणि MNS ची मतसंख्या वाढेल असेही काही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंनी साथ सोडण्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी झाली होती. अनेक आमदार, खासदार अन् कार्यकर्त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यात विधानसभेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली होती. त्यामुळे ठाकरेंचा मुंबईचा गड कोसळणार, अशीच स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जात होते. पण ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजप अन् शिंदेसेनेला कडवे आव्हान मिळू शकते. मराठी मतांच्या जोरावर दोन्ही भाऊ पुन्हा एकदा बीएमसीवर झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखात आहेत.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. २ दशकांपूर्वी राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली होती. पण आता दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आल्याने मराठी माणसाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची जुनी ओळख परत येईल, असे म्हटले जातेय. ठाकरे बंधूंच्या एकीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल, याचा फायदा बीएमसीच्या निवडणुकीत दिसू शकतो.
राज आणि उद्धव मागील २ दशकांपासून वेगळे लढत होते, त्यामुळे मराठी माणसांच्या मतांची विभागणी होत होती. आता एकत्र आल्याने पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येतील, त्यामुळे मतांचे ध्रवीकरण थांबेल. याचाच फायदा मतपेटीत दिसू शकतो. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रचार अधिक प्रभावी होईल. राज ठाकरेंचा मराठी माणसांवर प्रभाव जास्त आहे, त्यामुळे मतांचे एकीकरणासाठी याचा फायदा होऊ शकतो. दुसर्या बाजूने विचार केला तर राज ठाकरेंमुळे ठाकरेंकडील परप्रांतीय मते दुरावली जाण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यावेळी केंद्रस्थानी उद्धव ठाकरेच होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला. आता पुन्हा एकदा राज्यात नव्या युतीचा जन्म होतोय. आताही केंद्र स्थानी उद्धव ठाकरेच आहेत. पण आता उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे आहेत. ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने मुंबईसह राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होईल. कदाचीत भाजपला आपली रणनीती बदलावी लागेल, असे काही विश्लेषकांनी सांगितले. ठाकरे बंधू सध्या फक्त सहा ते सात महापालिकेत एकत्र लढणार आहेत. पण जर या निवडणुकीत दोन्ही भावाला प्रदीर्घ असे यश मिळाले तर राज्यात ठाकरेंचा प्रभाव नक्कीच वाढेल असे दिसतेय .
मराठी मते एकवटली नाहीत तर राज ठाकरेंसोबत जाणं ही उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण, मागली काही निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला मते मिळालेली नाहीत. २०२५ मध्ये राज ठाकरेंचा एकही आमदार निवडून आला नाही. राज ठाकरे यांना स्वतंत्रपणे फारशी मते मिळत नसल्याचे मागील ५ वर्षांत दिसून आलेय. त्यात परप्रांतियांविरोधात राज ठाकरेंची आक्रमक भूमिका आहे. यामुळे उद्धव ठाकरेंपासून मुस्लिम अन् पर प्रांतीय मते दुरावली जाऊ शकतात.
दोन्ही ठाकरेंच्या कट्टर मराठी धोरणामुळे मुंबईतील उत्तर भारतीय, गुजरातीसह इतर परप्रांतीय मते महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे. राज-उद्धव एकत्र आल्यास मविआमध्ये फूट पडू शकते. कारण, राज ठाकरेंच्या धोरणाला काँग्रेसने नेहमीच विरोध केलाय. दरम्यान, राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्व अन् मराठी अस्मिता घेऊन राजकारण करत आहेत. त्यात उद्धव ठाकरेंचे धोरण थोडं मवाळ झालेय. त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या वैचारिक फरकामुळे मतदार दुरावला जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.