Raj Thackeray
Raj Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: नाराज राज ठाकरेंची बैठकीला दांडी; सिंधुदुर्गात मनसेमध्ये गटबाजी उघड, लवकरच मोठा निर्णय घेणार

साम टिव्ही ब्युरो

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakceray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्गात राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये मेळ दिसत नाहीये.

अनेकांना मनसेसाठी काम करायचं आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे शक्य होत नसल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग कणकवली इथे पदाधिकाऱ्यांकडून बैठकीचे ढिसाळ नियोजन करण्यात आलं होतं. तसेच सिंधुदुर्ग मनसेमध्ये गटबाजी आणि विस्कळीतपणा असल्याचं निदर्शनात आलं आहे.सिंधुदुर्गमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून इतर कार्यकर्त्यांना बैठकीबद्दल निरोपच पोहोचले नाहीत. बैठकीच्या ढिसाळ नियोजनामुळे नाराज झालेले राज ठाकरे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. (Latest Marathi News)

मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई यांनी घेतली कणकवलीमध्ये बैठक घेतली.सिंधुदुर्ग मनसे कार्यकारणी एक ते दोन दिवसात बरखास्त होण्याची शक्यता आहे, बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

अनेकांना मनसेसोबत काम करायचं आहे. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे ते येऊ इच्छित नाहीत. पक्षप्रमुखांच्या ही बाब लक्षात आली आहे. मात्र चांगली लोकं या पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात येत नाहीयेत.त्यामुळे कुठेतरी हा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या निर्णयापर्यंत पक्षप्रमुख पोहोचले आहे. कार्यकारिणी बरखास्त करण्याबाबतचा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे, त्याबाबत ते निर्णय घेतील, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crop Loan : वर्धा जिल्ह्यात पीक कर्जासाठी बँकांना ११०० कोटींचे उद्दिष्ट; १० टक्के कर्ज वितरित

Soni Razdan News : आलिया भट्टच्या आईसोबत झाला मोठा स्कॅम, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला महत्वाचा सल्ला

Rohit Pawar News: 'मतदानाचा परळी पॅटर्न', बीडमध्ये बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; VIDEO

Constable Vishal Patil Death Case: विशाल पवार मृत्यू प्रकरणात, शवविच्छेदनातून चक्रावून टाकणारी माहिती उघड

Benifits of Fruit Peel: फळांच्या सालीचे त्वचेसाठी जबरदस्त फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT