kolhapur, satara, sangli saam tv
महाराष्ट्र

NDRF In Kolhapur: पावसाच्या काेसळधारा... काेयनेत तुफान, सांगलीचा पूर्व भाग काेरडाच, कोल्हापूरात धुमशान; धबधब्यांवर पर्यटनाचा मोह टाळा (पाहा व्हिडिओ)

Satara, Sangli, Kolhapur Rain Updates : पावसाळ्यात धोकादायक वाहतूक टाळावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर, विजय पाटील, संभाजी थाेरात

Rain Update : सातारा, सांगली, काेल्हापूर जिल्ह्यात आजही (बुधवार) सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील काेयना धरणात सकाळी आठ वाजेपर्यंत 31.10 टीएमसी पाणीसाठा झाला. सांगली जिल्ह्यात पश्चिम भागात पाऊस असला तरी पूर्व भाग मात्र अद्याप कोरडाच राहिल्याने शेतक-यांना चिंता लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंधराहून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. (Maharashtra News)

पाटण तालुक्यात जाेर

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. संगमनगर- काडोली रस्ता पाण्याखाली गेला आहे. या रस्त्यावर अडीच फूट पाणी आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे.

राधानगरी धरण 58 टक्के भरले

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये मंगळवारपासून धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे. शहर आणि परिसरात पावसाचा आजही जोर वाढलेला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील प्रमुख15 धरणांपैकी 7 धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. राधानगरी धरण 58 टक्के भरले आहे. राधानगरी धरणातून प्रतीसेकंद ७०० क्यूसेक पाण्यचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पंचंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. काल दिवसभरात पडलेल्या पावसामुळे एक फुटाने पाणी पातळीत वाढ झालेली आहे. तर पंचगंगा नदीवरील एकूण बारा बंधारे पाण्याखाली आहेत.

पडसाळीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूरहून पडसाळी परिसरात जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पिसात्री इथल्या जांभळी नदी पुलावर 4 फुट पाणी आलं आहे. काळजवडे, पोंबरे, पडसाळी रोड मार्गे पिसात्री मध्ये येणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यात धोकादायक वाहतूक टाळावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वर्षा पर्यटनाचा मोह टाळा

राधानगरी परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. पावसासोबत वाऱ्याला प्रचंड वेग आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडत आहेत. पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा मोह टाळावा असा आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे .

गडहिंग्लजला पावसाचा जोर

जिल्ह्यातील चंदगड आजरा गडहिंग्लज या परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे या परिसरातील नद्या नाले दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे आजरा साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. या परिसरातील वाहतूक ठप्प झालेली आहे.

बर्कीचा रस्ता बंद

दरम्यान बर्की (ता. शाहूवाडी) धबधब्याकडे जाणाऱ्या पुलावर आज (बुधवार) सकाळी पाणी आले आहे. त्यामुळे बर्की धबधबा पाहण्यासाठी जाता येत नसल्याने पर्यटकांचा हिरमाेड झाला आहे. प्रशासनाने धबधबा पाहण्यासाठी जाणाऱ्यांनी धाेकादायक वाहतुक करु नये असे आवाहन केले आहे.

दरम्यान पावसाचा अंदाज घेत प्रशासनाने एनडीआफएफचे एक पथक काेल्हापूरात तैनात ठेवले आहे.

जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात कालपासून संततधार पाऊस सुरू झाला मात्र पूर्व भाग अद्याप कोरडाच असून जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढू लागली.

या पार्श्वभूमीवर जत तालुक्याला पाणी देण्यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले असून 12 पंपाद्वारे पाणी उपसा करून तो जत मधील पाणी नसलेल्या भागात नेण्यात येणार आहे.

पेरण्यांनी गती घेतली

दुसरीकडे कोयना, वारणा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांनी गती घेतली आहे. वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

कोकरूड बंधारा पाण्याखाली

वारणा धरण क्षेत्रात २९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात सध्या १५.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान शिराळा तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसाने कोकरूड बंधारा पाण्याखाली गेला. शिराळा तालुक्याची पाणीपातळी देखील वाढू लागली आहे. वारणा नदीची पाणीपातळी वाढून कोकरूड येथील बंधारा पाण्याखाली गेला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT