rain, bhandara news saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : लाखांदूर तालुक्यात मुसळधार पाऊस; सरांडी बुज गावात शिरलं पाणी

त्यामुळे आता तालुक्यातील धान पिकाला मोठा फायदा झाला तर नदी नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.

Siddharth Latkar

BHANDARA News : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक दिवसाच्या उसंतीनंतर पुन्हा पावसाने जोर पकडला. आज (शनिवार) या भागात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. (Maharashtra News)

तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज गावात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने घरातील जीवनापयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाली आहे.

लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज येथे सकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने गावातील रस्त्यांवर पूर सदृश्य पाणी वाहू लागला. तर रस्त्यावरून वाहणारे पाणी थेट लगतच्या घरांमध्ये शिरले. घरात जवळपास एक ते दीड फुट पाणी जमा झाले. त्यामुळे घरात ठेवलेले गहू,तांदूळ यासह अनेक साहित्याची मोठी नुकसान झाली आहे.

सरांडी बुज येथील नंदा विठ्ठल भरणे,हेमलता हेमराज मिसार्,भूपेश गजानन बुराडे,मनीषा बाळू बूराडे,तुलाराम बुरादे,हिरामण दोनाडकर,प्रतिभा ईश्वर कुथे यांच्यासह अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.

तालुका प्रशासनाने तात्काळ नोंद घेऊन मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. लाखांदूर तालुक्यातील शनिवारी दोन ते अडीच तास मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आता तालुक्यातील धान पिकाला मोठा फायदा झाला तर नदी नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकारणात नव्या समीकरणांची नांदी? एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार?

Raj Thackeray: 'ही लाडकी बहीण योजना? महाराष्ट्रातही युपी बिहारमधील प्रकार सुरू; मुली नाचवण्यावरून राज ठाकरे संतापले

Satej Patil : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्याशी बोलताना हुंदका भरला, VIDEO

Manoj Jarange News : विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची माघार, कुणाचा होणार मोठा फायदा? VIDEO

Maharashtra News Live Updates: मोठी बातमी! महाराष्ट्र मध्यप्रदेश बॉर्डरवर पोलीसांना कारमध्ये 70 लाखांची रोकड

SCROLL FOR NEXT