- संजय सूर्यवंशी
Nanded News : दात आहेत पण चणे नाहीत असाच काहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यातून समाेर आला आहे. या जिल्ह्यातील सिंगारवाडी गाव आजही दूरसंचार व्यवस्थेपासून काेसाे दूर राहिले आहे. माेबाईलमुळे जग जवळ आले असले तरी सिंगारवाडीत (singarwadi village) ग्रामस्थांकडे असलेल्या माेबाईलला नेटवर्कच मिळत नाही. त्यामुळे सिंगारवाडी जगापासून अलिप्त टाकल्यासारखी झाली आहे. (Maharashtra News)
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अतिशय डोंगराळ भागात वसलेलं सिंगारवाडी हे गाव आजही जगाच्या संपर्कात नाहीये कारणही तसच आहे. या गावात कोणत्याच कंपनीचे मोबाईल टॉवर नाहीत.
मोबाईल टॉवर नसल्याने इंटरनेटची सुविधा नाही. मोबाईल असून नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना उंच टेकडीवर किंवा झाडावर जाऊन नेटवर्कच्या संपर्कात यावं लागत. नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
ग्रामस्थांकडून अनेकदा या परिसरात मोबाईल टॉवरची मागणी झाली. अद्याप गावाला टॉवर उभारून देण्यात आलेला नाही. सिंगारवाडी सोबतच इंजेगाव, सुंगगुडा, पिंपरफोडी या गावात देखील मोबाईलला नेटवर्क मिळत नाही.
तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील ही गावे आहेत. मोबाईल नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. शासनाने तात्काळ या गावात मोबाईल टॉवर उभारून नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.