Maharashtra Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Forecast : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण कसं असेल? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

Rain Alert in Maharashtra : राष्ट्रवादीच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Rain Update :

राज्यात पावसाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्याने पिकं माना टाकू लागली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिला. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने दोन्ही महिन्यांची सरासरी भरुन निघाली. पण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने चिंता आणखी वाढली आहे. राज्यात पुढील ५ ते ६ दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता नाही.

सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनचा पाऊस आणि ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस कसा राहील, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत चांगला पाऊस पडू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

परतीचा पाऊस चांगला आधार देण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंतर होसाळीकर यांनी अॅग्रोवनशी खास बातचित केली. यामध्ये त्यांनी सांगितलं की, आयओडी थोडा उशिरा सक्रिय झाला. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडला. पण आता हा आयओडी सक्रिय झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडू शकतो. ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाऊस चांगला आधार देण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांमध्ये आपल्याकडे परतीचा पाऊस चांगला झालेला आहे. (Latest Marathi News)

८ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

हवामान विभाग दर गुरुवारी पुढील चार आठवड्यांचा अंदाज देत असते. ताज्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमीच राहील. पण ८ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील, अशी अपेक्षा आहे, असा अंदाजही डॉ. होसाळीकर यांना व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : राज ठाकरे कुटुंबासह मतदानासाठी दाखल

Mitali Mayekar Mangalsutra: ट्रेडिशनल ते वेस्टर्न, प्रत्येक साडीवर मॅचिंग होईल मिताली मयेकरच्या मंगळसूत्राच्या डिझाइन

Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग, मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?

Famous Director : प्रसिद्ध दिग्दर्शकाची फसवणूक; 5 लाखांचा गंडा, FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

मतदानाआधी पैशांचा पाऊस! 50 लाखांची रोकड जप्त, नोटांच्या गड्ड्या पाहून पोलिसही चक्रावले|VIDEO

SCROLL FOR NEXT