तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने सोलापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून, ते आता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानं त्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला होता. आता त्यांनी सोलापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे. (Latest News)
भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या 25 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. आता हे सर्व पदाधिकारी आज सकाळी 11 वाजता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे पदाधिकारी काल रात्रीच हैदराबादला रवाना झाले असून,मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
आगामी विधानसभा,लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Political News)
काही दिवसांपूर्वीच दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध सरपंचांसह ३५० जणांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३८ गावातील विद्यमान सरपंच, १२ माजी सरपंच, १२ ग्रामपंचायत सदस्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.