MNS Padyatra: मुंबई-गोवा हायवेवरील दिरंगाईवर रवींद्र चव्हाणांचे खुले चर्चासत्र; कोकणातील विकास कामांची दाखवली व्हिडीओ क्लिप

Mumbai Goa Highway Potholes: रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आसून मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रेला सुरूवात झाली आहे.
MNS Padyatra
MNS PadyatraSaam TV
Published On

अभिजित देशमुख

MNS Jagar Yatra: मुंबई गोवा महामार्गावरून मनसेने पनवेलमधून आपल्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आसून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रेला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई - गोवा हायवे दिरंगाईवर खुले चर्चासत्र आयोजित केलं आहे. (Latest Marathi News)

आज ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील जिमखान्यात आयोजित करण्यात आलेल्या या खुल्या चर्चा सत्रात कोकणवासीय मुंबई- डोंबिवलीकरांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. मनसेला प्रत्युत्तर देण्यासाठीच या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय.

MNS Padyatra
Thane Crime News : बहिणीला त्रास देणाऱ्या दोघांना कायमचं संपवलं, चौघांना अटक; पोलीस दोन महिने करत होते तपास

मुंबई गोवा महामार्गाचे काम १२ वर्षांपासून रखडले असून ४ वर्षात समृद्धी महामार्गाचे काम झाले. मग कोकण मार्गच वेळेत पूर्ण का होत नाही या कोकणवासीयांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या काका कदम आणि त्यांच्या टीमने या विषयावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या बरोबर चर्चेचे आयोजन केले आहे.

महामार्गासाठी पुरेसा निधी असतानाही मार्ग का रखडला? इतर महामार्गातील आपघाताची शासन दरबारी दखल घेतली जाते मग फक्त मुंबई गोवा महामार्गाचीच का नाही? महामार्गाचे काम पूर्ण झाल्याखेरीज या मार्गावर टोल आकारणी केली जाऊनये यासारख्या प्रश्नासह समस्येवर चर्चा करून तातडीने निर्णयाप्रत पोचण्यासाठी या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. महामार्गाचा पदभार स्वीकारल्यापासून ८ वेळा पाहणी करत त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न आणि महामार्ग कधीपर्यंत सेवेत येणार याविषयी सविस्तर माहिती मंत्री चव्हाण देत आहेत.

MNS Padyatra
Mumbai Traffic Police : मुंबईत 9 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला 'नो हॉर्निंग डे', वाहतूक पोलिसांची खास मोहीम

या कार्यक्रमात कोकणातील विकासाची क्लिप दखवण्यात आली आहे. कोकणातील १२ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात येणार आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरात सुशोभीकरण, बस स्टॅन्ड, रिक्षा स्टॅन्ड, प्रवाशंसाठी शेड, पार्किंग आदी कामे करण्यात येणार आहेत. यामुळे कोकणातील पर्यटनासाठी चालना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com