Mumbai Traffic Police : मुंबईत 9 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला 'नो हॉर्निंग डे', वाहतूक पोलिसांची खास मोहीम

No Horn Please : बुधवारी 9 ऑगस्टचा पूर्ण दिवस आणि 16 ऑगस्टचा पूर्ण दिवस ही अनोखी मोहीम राबवली जाणार आहे.
Mumbai Traffic Police
Mumbai Traffic PoliceSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai News : मुंबई वाहतूक पोलिसांकडून ऑगस्ट महिन्यातील दोन दिवस नो हॉर्निंग प्लीज ही मोहीम राबवली जाणार आहे. याची सुरुवात आज ९ ऑगस्ट या दिवशी करण्यात आली असून या मोहिमेचा पुढचा टप्पा 16 ऑगस्ट या दिवशी राबवला जाणार आहे. वाढत्या ध्वनी प्रदूषणाचा विचार करता ही मोहीम राबवण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

बुधवारी 9 ऑगस्टचा पूर्ण दिवस आणि 16 ऑगस्टचा पूर्ण दिवस ही अनोखी मोहीम राबवली जाणार आहे. शहरात माणसांची जेवढी गर्दी आहे, त्याहीपेक्षा जास्त गर्दी रस्त्यावर वाहनांची पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईकरांना दोन दिवसाकरिता कर्कश आवाजापासून दिलासा मिळणार आहे. मुंबईत अंधेरी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने अंधेरीतील मुख्यमार्गांवर वाहन चालकांना नो हॉर्न प्लीज असं आवाहन करताना दिसून आले. (Latest Marathi News)

Mumbai Traffic Police
Bhopal Lokayukta Raid VIDEO : ४५ हजारांची सरकारी नोकरी; घरावर धाड पडली अन् अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले, पैसे मोजायलाही मशिन लागली

मुंबईत वाहनांची मोठी संख्या आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच ध्वनी प्रदूषण होते. शहराला या समस्येपासून मुक्त करण्यासाठीच ही मोहीम राबवली जात आहे. यापूर्वी अशी मोहीम 14 जून रोजी देखील राबवण्यात आली होती.

आता ऑगस्ट महिन्यात देखील आज 9 ऑगस्ट पूर्ण दिवसभर आणि पुन्हा 16 ऑगस्ट या दिवशी पूर्ण दिवसभर नो हॉर्न प्लीज ही मोहीम राबवली जाणार आहे. ही मोहीम राबवताना वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून जागोजागी तैनात करून हॉर्नबाबत विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. गरज असेल त्याच वेळी हॉर्न वाजवा हा सल्ला प्रत्येकाला देण्यात येणार आहे. (Maharashtra News)

दिवसभरात वाहन चालकांकडून अनेकदा हॉर्न वाजवले जाते याचा त्रास लहानांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच होत असतो. विशेष करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहनांची गर्दी जास्त दिसून येते. अशा वेळी हॉर्न वाजवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या वाहनचालकांवर योग्य ती कारवाई केली जाणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस प्रशासनाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले आहे.

Mumbai Traffic Police
Chandrayaan-3 Update News : चांद्रयान-3 कुठपर्यंत पोहोचलं? चंद्रापासून १४३७ किमी दूर

रस्त्यावर वाहन चालवताना विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्याला यावेळी पोलिस चौकीत दाखल केले जाणार आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील लोकांना आवाहन केले आहे की, या मोहीमेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. तसेच ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण कमी करणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश असणार आहे.

हॉर्नच्या मोठ्या आवाजाने खूप लोकांना अकाली बहिरेपणा येण्याची शक्यता असते आणि आरोग्यावरही याचा मोठा परिणाम होतो. म्हणून या महिन्यात बुधवार 9 आणि 16 ऑगस्टअसे दोन दिवस'नो हॉर्निंग डे पाळण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com