Thane Crime News : बहिणीला त्रास देणाऱ्या दोघांना कायमचं संपवलं, चौघांना अटक; पोलीस दोन महिने करत होते तपास

Crime News : दोघांची शिर्डीत हत्या करून त्यांचे मृतदेह कसारा घाटात दोन वेगवेळ्या ठिकाणी फेकले होते.
Kasara News
Kasara NewsSaam TV

फैयाज शेख

Kasara News : बहिणीला व्हॉट्सअॅपवर अनेकदा कॉल व मॅसेज करून त्रास देणाऱ्या दोघांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघांची शिर्डीत हत्या करून त्यांचे मृतदेह कसारा घाटात दोन वेगवेळ्या ठिकाणी फेकणाऱ्या चार आरोपीना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिन्यांच्या तपासाअंती अटक करण्यात यश आले आहे.

मनोज शिवप्पा नाशी (वय २४), कुणाल प्रकाश मुदलियार (वय २३), प्रशांत अंबादास खुलुले (वय २५), फिरोज दिलदार पठाण (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चारही आरोपी शिर्डीमधील रामनगरमधील रहिवासी आहेत. तर सुफीयान सिराबक्ष घोणे (वय ३३) आणि साहिल पठाण (वय २१) असे हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. (Latest Marathi News)

Kasara News
Udayanraje Bhosle News : आगामी लोकसभेचे तिकीट मिळण्याबाबत खासदार उदयनराजेंच्या मनात शंका? काय म्हणाले...

शहापूर तालुक्यातील कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात व्यक्तीचे मृतदेह मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्यात फेकले असल्याची माहिती कसारा पोलिसांना १९ जून रोजी दुपारच्या सुमारास मिळाली होती. त्यावेळी पहिला मृतदेह मुंबई-नाशिक महामार्गावर वाशाळा फाटा या ठिकाणी आढळला. (Crime News)

Kasara News
Pune Crime News: पैशाचा वाद विकोपाला गेला... मित्रांनीच मित्राचा काटा काढला; वाघोलीत खळबळ

पोलीस घटनास्थळी पंचनामा करत असतानाच, दुसरा मृतदेह नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पाँईंटजवळ मार्गालगतच्या झाडाझुडपात असल्याची माहिती मिळाली होती.

दोन्ही ठिकाणी पोलिसांनी पंचनामे करत, दोन्ही घटनेतील अज्ञात आरोपींविरोधात हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलीस तपास सुरू केले होते. त्यानंतर दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणात चारही आरोपींना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com