Satara News : साताऱ्याचं राजकारण म्हटलं तर खासदार उदयनराजे भोसले यांचा नाव सर्वात पुढे येतं. मात्र उदयनराजे भोसले यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सावध भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
खासदार उदयनराजे भोसले म्हणजे एकदम बेधडक व्यक्तिमत्त्व. परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकीटबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला चक्क उदयनराजेंनी बगल दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे उदयनराजेंना तिकीट मिळण्याबाबत शंका आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Latest Marathi News)
महायुतीमध्ये अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणं देखील बदलली आहेत. साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या राज्यसभेवर असलेल्या उदयनराजेंना भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळेल की नाही याबाबत खात्री नाही. (Political News)
याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, आताच सगळे उघड केले तर कसे होणार. लोकांचा आग्रह असतो. तो पण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. उदयनराजे भोसले यांनी काल सातारा शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.