maharashtra rain likely during Janmashtami celebrations AI Image
महाराष्ट्र

Rain Alert : श्रीकृष्ण जन्माष्टमीला पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रातील काही भागांत आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • आज राज्यभरात जन्माष्टमीचा सोहळा पार पडणार

  • श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्याला पावसाची हजेरी लागणार

  • विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

  • अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यभरात आज रात्री १२ वाजता जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्याला वरूण राजाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाची शक्यता आहे. काल मुंबईसह अनेक ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यात टप्प्या टप्प्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे वादळी पावसाच्या सरी पडू शकतात. धुळे जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, विजांसह हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. राज्याच्या उर्वरित भागात मात्र पावसाचा फारसा जोर राहणार नसून, ढगाळ वातावरणासह ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या प्रणालीला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ही हवामान प्रणाली आज दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या हालचालीमुळे विदर्भासह राज्यातील काही भागांतील पावसाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT