Alisha Khedekar
गोकुळाष्टमीला काकडीमधून बाळकृष्णाचा जन्म करण्याची प्रथा महाराष्ट्रातील अनेक भागांत श्रद्धेने पाळली जाते.
काकडी कापून त्यातून कृष्णाची मूर्ती बाहेर काढणे, देवकीच्या गर्भातून कृष्णजन्म झाल्याचं प्रतीक मानलं जातं.
काकडीच्या आत बिया असतात आणि तिची रचना गर्भासारखी वाटते, म्हणून ती जन्माचं प्रतीक मानली जाते.
काकडी ही शेतात सहज मिळणारी भाजी असल्यामुळे ग्रामीण भागातील कृष्णजन्माच्या सोहळ्यात तिचा वापर वाढला.
कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याची मान्यता आहे. त्यामुळे काकडी कापून जन्मोत्सवही रात्री बारा वाजता केला जातो.
काकडी कापण्याचा क्षण म्हणजे अंधारातून प्रकाशाचा जन्म आणि संकटांवर सत्याचा विजय, असा भाविकांचा विश्वास आहे. ही प्रथा स्थानिक लोकपरंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढींमधून पुढे आली.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा