Rain Alert Saam Digital
महाराष्ट्र

Rain Alert : पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपलं; सोलापुरात नद्यांना पूर, पुणे पुन्हा पाण्यात

Sandeep Gawade

दोन दिवसांपासून पावसाने राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला असून पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपून काढलं आहे. सोलापूर तालुक्यातील बार्शीच्या आगळगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर आला आहे. या पुरात महिला रुग्णाला घेऊन जाताना ॲम्बुलन्स अडकून पडली होती. पावसाचा काही पिकांना फायदा असला तरी सोयाबीन सारख्या पिकाला मोठा फटका बसला आहे.

इंदापुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने सुरुवात झाल्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आज सकाळपासून काही ठिकाणी तुरळक तर शहर व शहराच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलीय.या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेली पिकांचे मोठे नुकसान होणार असून फळबागासह भाजीपाला पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

पुण्यात अवघ्या तीन तासात 124 मिलिमीटर पाऊस

शिवाजीनगर: १२४ मिलिमीटर

वडगाव शेरी: ७१.५ मिलिमीटर

कोरेगाव पार्क: ६३ मिलिमीटर

हडपसर: ३८ मिलिमीटर

खडकवासला धरणातून २५६८ क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पुण्यात सलग ३ दिवसांपासून दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली माहिती दिली आहे. तर खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरली आहेत. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाला बसला मोठा फटका बसला. ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन पीकाचे पावसामुळे झाले प्रचंड मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी झाला हवालदील झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठवाडा-विदर्भासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; शाह - पवारांमध्ये राजकीय कुस्ती

Mumbai Schools Closed Tomorrow : मुंबईत वरुणराजा धो धो बरसला, शहरांतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Marathi News Live Updates: नवी मुंबई परतीच्या पावसाचा धुमाकूळ,

Mumbai Rain: मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या

Laxman Hake : जरांगे पाटील नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलं; लक्ष्मण हाके यांची टीका

SCROLL FOR NEXT