Heavy rain alert saam tv
महाराष्ट्र

Rain Alert: 'शक्ती'मुळे पावसाचा पुन्हा तांडव, कोकणासह मराठवाड्याला झोडपणार; ७ राज्यांनाही इशारा

Shakti Cyclone: शक्ती चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस धुमाकळू घालणार आहे. कोकणसह मराठवाड्यातील जिल्ह्यांना हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर ७ राज्यांना देखील चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Priya More

Summary -

  • ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.

  • कोकण, मराठवाडा आणि उत्तर भारतातील ७ राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात मान्सून पु्न्हा सक्रिय झाला आहे. ७ राज्यांना पाऊस झोडपून काढणार आहे. पुढचे चार दिवस दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ढगांचा गडगडाच आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे या राज्यात सकाळी आणि संध्याकाळी थंडावा जाणवेल. सकाळपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू हईल जो दिवसभर अधूनमधून सुरू राहिल.

हवामान खात्याच्या मते, आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील हवामान प्रणाली सतत सक्रिय असल्याने तामिळनाडूच्या १४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शक्ती चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहेत. ७ ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि मुंबईमध्ये तीव्र ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तरी या वादळाचा कुठलाच परिणाम कोकण किनारपट्टीवरती नाही. रत्नागिरी जिल्ह्यासह किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र किनारपट्टी भागात पावसाची शक्यता आहे.

खोल समुद्रात या वादळाचा परिणाम राहणार आहे. खोल समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी ५० किलोमीटर असण्याची शक्यता आहे. काही वेळेला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. किनारपट्टी भागात सध्या वातावरण शांत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बेपत्ता चार पर्यटकापैकी दोघेजण अजूनही बेपत्ता; तिसऱ्या दिवशीही शोधमोहिम सुरू

Box Office Collection: 'कंतारा २' ची बंपर कमाई, 'सनी संस्कारी...' ला मोठा झटका; जाणून घ्या कलेक्शन

संध्या शांताराम यांनी अखेरचा श्वास कुठे घेतला? त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? सावत्र मुलानं सांगितलं खरं कारण

सरकारी शिक्षकाचा 'सुकन्या'च्या नावाखाली घोटाळा, १५००० जणांना तब्बल १५० कोटींचा चुना

Accident: येवल्यात अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने चिरडलं; चिमुकलीसह एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT