Barshi Crime News : रेल्वेच्या नागरकोईल गाडीमध्ये डब्यामध्ये बोगस तपासणीसाने प्रवाशांचे तिकीट तपासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेममध्ये तिकीट तपासणी करीत असतानाच तोतया तिकीट तपासणीसावर संशय आला. जागरुक प्रवाशांनी या तोतयाला प्रश्नांचा भाडीमार करत त्यांचा संशय खरा ठरताच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात कल्याण लोहमार्ग न्यायालयात उभे केले असत त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)
राहुल संजय सोनवणे(वय ३० ,उल्हासनगर,मूळ गाव जळगाव)असे पोलिस कोठडी मिळालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस रविंद्र गावडे यांनी फिर्याद दाखल केली ही घटना गुरुवार रोजी कल्याण ते कर्जत दरम्यानच्या रेल्वेमार्गावर घडली.
रात्री साडेदहा वाजता कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बार्शी येथील मनिष देशपांडे,आकाश दळवी,आकाश पवार असे तिघे जण नायरकोईल रेल्वे एक्स्प्रेसने कन्याकुमारी येथे जात असताना त्यांच्या डब्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
मनिष देशपांडे,आकाश दळवी,आकाश पवार हे रेल्वेच्या (Railway) नागरकोईल गाडीतील एका डब्ब्यातून प्रवास करत होते. त्यावेळी डब्यामध्ये एक तिकीट तपासनीस आला कपाळाला टिळा, अंगात जॅकेट,पायात बूट,हातात कागद पेन,गळ्यात ओळखपत्र असा पेहराव असणारा तपासणीस आला. सध्या प्रत्येक तिकीट तपासनीसाकडे टॅब असतो त्यामुळे त्याच्याविषयी यांच्यामध्ये संशय निर्माण झाला.
संशय बळावल्याने तरुणांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन त्यास ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली. त्याचबरोर तसेच आमचे नाव कागदावरील यादीमध्ये दाखव असे म्हणताच त्याची भंबेरी उडाली. ओळखपत्राबद्दल विचारणा केल्यावर बॅगमध्ये असल्याचे त्याने सांगितले. तर कोणते स्टेशन येणार आहे असे विचारता मोबाईलवर लोकेशन पाहू लागला. त्यामुळे त्या तरुणांचा आणखी संशय बळावला.
दरम्यान, कर्जत (Karjat) रेल्वे स्थानकात येताच रेल्वेच्या पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्ञानेश्वर पाटील,सुनील ठाकूर,किरण देवकर यांच्या पथकाने तोतया तपासणीसाला अटक केली.
शासकीय लोकसेवक नसताना रेल्वेच्या डब्यामध्ये तोतया तिकीट तपासणीस बनून प्रवाशांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी सरकाळे करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.