new cord line project between Panvel Somatne and Panvel Chikhli Saam Tv News
महाराष्ट्र

Panvel-Somatne Cord Line : रेल्वे मंत्रालयाची पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान नवीन कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

Panvel-Somatne and Panvel-Chikhli New Cord Lines : पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे, जे उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत असे अनेक दिशांना एक महत्त्वाचे जंक्शन म्हणून काम करते.

Prashant Patil

मुंबई : मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या विकासात, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाईन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाणार आहे.

पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे, जे उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत असे अनेक दिशांना एक महत्त्वाचे जंक्शन म्हणून काम करते. सध्या, ग्रेड-सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सल झाल्यामुळे परिचालनसाठी विलंब होतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी, दोन कॉर्ड लाईन्स प्रस्तावित करण्यात आल्या आहेत आणि आता त्यांना मान्यता देण्यात आली आहे.

* जेएनपीटी-कर्जत कॉरिडॉरवर दिवा-पनवेल लाईन फ्लायओव्हर मार्गे कॉर्ड लाईन

* काळदुंरीगाव केबिन आणि सोमटणे स्टेशन दरम्यान दुसरी कॉर्ड लाईन

या नवीन लिंक्समुळे रेल्वेची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल आणि गर्दी कमी होईल, ज्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची वाहतूक सुरळीत आणि जलद होईल अशी अपेक्षा आहे.

राज्यात आणखी एका रेल्वे मार्गाला मान्यता

राज्यात आणखी एक रेल्वे मार्गाला मान्यता मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिलीये. ४९४.१३ कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी मंजूर करण्यात आला आहे.

राहुरी ते शनी शिंगणापूर या रेल्वे मार्गावर शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब करवीरेश्वर मंदिर (नेवासा) यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. या धार्मिक आणि पर्यटना स्थळांना देखील फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

या प्रकल्प अहवालात (डीपीआर) दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव आहे. यामध्ये अंदाजे वार्षिक प्रवासी संख्या १८ लाख असेल. शनी शंगणापूर हे आध्यात्मिक केंद्र आहे. या केंद्राकरीता ही पायाभूत सुविधा आणि दळणवळण सुधारण्यासाठी हा विकास एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT