Raigad Zilla Parishad election results BJP and Shinde Sena performance : जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात भाजपच्या खासदारांना पराभवाचा जोरदार धक्का बसलाय आहे. रायगड जिल्हा परिषदेत भाजपचे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नीनं नशीब अजमावले. पण त्यांना पराभवाचा धक्का (Raigad ZP election latest result updates) बसलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने निलीमा पाटील यांचा ३५०० मतांनी दारूण पराभव केला. निलीमा पाटील सुरूवातीला आघाडीवर होत्या. पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये शिंदेच्या शिवसेना उमेदवाराने बाजी मारली. निलीमा पाटील यांच्या पराभवामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशाचे वातावरण आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार जल्लोष साजरा कऱण्यात येतोय. दरम्यान, महाडमध्ये तिसऱ्या फेरीअंती शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा विराट विजय झालाय. त्यांनी राष्ट्रवादीच्या निलेश महाडीक यांचा दारूण पराभव केला. (Mahad and Poladpur ZP seats won by Shinde Sena analysis)
रायगडमध्ये मतदारांनी घराणेशाहीला नाकारल्याचे दिसतेय. खासधार धैर्यशील पाटील यांच्यासह माजी आमदार अशोक साबळे यांनाही पराभवाचा धक्का बसलाय. रायगड जिल्हा परिषद निजामपूर मतदार संघातून माजी आमदार अशोक दादा साबळे यांचे सुपुत्र राजू साबळे पराभूत झाले आहेत. शिंदेसेनेच्या अविनाश नलावडे यांनी केला राजू साबळे यांचा पराभव केला. (Maharashtra Zilla Parishad election political analysis)
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडमधील आपला गड राखला. महाड, पोलादपुरात राष्ट्रवादी आणि भाजप मोठा धक्का बसलाय. महाडमध्ये 5 आणि पोलादपुरमध्ये 2 म्हणजे सर्वच्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे प्रविण आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची प्रतिक्षा पणाला लागली होती. त्यांच्या पदरी पराभव पडलाय.
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणी दरम्यान पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ जोरदार राडा झाला होता. गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने तणावाचे वातवरण होते. पोलिसांनी सूचना देऊन सुद्धा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.