raigad, sindhudurg, amboli ghat, waterfall, rain. saam tv
महाराष्ट्र

पर्यटन स्थळावरील जमावबंदी आदेश रद्द करा, रायगडकरांची मागणी; आंबाेलीत पाेलीसांचं चुकलं ?

पावसाळी पर्यटनासाठी युवा वर्ग काेकणसह रायगडची वाट धरु लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम, विनायक वंजारे

रायगड / सिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यापासून काेकणात तसेच रायगड (raigad) जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा आणि धबधब्यांचा तसेच निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील पर्यटक विकेंडला पर्यटनस्थळी गर्दी करीत आहेत. दरम्यान वाढती गर्दी लक्षात घेता रायगड (raigad tourisim) जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तर दूसरीकडे आंबाेली घाटात (amboli ghat) काही पर्यटकांच्या (tourists) बेजबादारपणामुळे रविवारी तब्बल तीन तास वाहतुक खाेळंबली हाेती. (kokan rain update)

पर्यटन स्थळांवरील जमावबंदी आदेश मागे घ्या

पावसाळा सुरु झालानंतर रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाला प्रारंभ होतो. पावसाळी पर्यटनाची मौज मजा लुटण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन पर्यटक रायगडमध्ये येतात. येथील धबधबे, नद्या पर्यटकांना आकर्षित करतात. दरम्यान अपघात टाळण्यासाठी शासनाने रायगडमधील पावसाळी पर्यटन स्थळांवर (144 कलम) जमावबंदी आदेश लागू केला आहे.

यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतोय. त्याचबरोबर स्थानिकांचा व्यवसाय देखील बुडत आहे. शासनाने सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्व घालुन द्यावेत. तसेच रायगडमधील पावसाळी पर्यटनावरील बंदी उठवावी अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांकडुन केली जात आहे.

सिंधुदुर्गात दमदार पाऊस

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार रात्री पासून काही प्रमाणात उसंत घेतलेल्या पावसाने आज (साेमवार) सकाळ पासून चांगली सुरुवात केली आहे. गेल्या एक तासापासून सिंधुदुर्गात सर्वदूर पाऊस कोसळत आहेत. येथील नद्यांची पातळी अद्याप खाली असून कुठेही पुराचे पाणी आलेले नाही. मात्र पावसाने दमदरा हजेरी लावल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.

आंबोली घाटात तीन तास वाहतुक ठप्प

आंबोलीत वर्षा पर्यटनास आलेल्या पर्यटकांना (रविवारी) घरी जाताना तब्बल तीन तास वाहतुक काेडींचा सामना करावा लागला. या भागात मुसळधार पाऊस पडत असून येथील धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आंबोलीत आलेल्या हजाराे पर्यटकांना वाहतुक काेंडीचा सामना करावा लागला.

या पर्यटनस्थळी हाेणारी गर्दी लक्षात सिंधुदुर्ग पोलीसांनी आवश्यक त्या उपाययाेजना करणे गरजेचे हाेते. परंतु जिल्हा पोलीस प्रशासनाने केवळ १० पोलीस आंबोलीत पाठवले होते. त्यातचं आंबोली धबधब्याच्या ठिकाणी काही युवकांच्या हुल्लडबजीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही पर्यटक रस्त्यातचं हुल्लडबाजी करत होते. त्यामुळे वाहतुक काेंडीची समस्या उद्भवली हाेती. तब्बल तीन तासानंतर येथील वाहतुक काेंडी सुटली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Skin Care : रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती फेस मास्क, सकाळी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Mumbai Tourism: 31 डिसेंबरला मुंबईतच पण गर्दी नसलेल्या ठिकाणी फिरायचंय? हे Hidden spots नक्की ट्राय करा

Mumbai Bullet Train : मुंबईतील बुलेट ट्रेन स्थानकाचं काम बंद! काय आहे नेमकं कारण? वाचा

Eyebrow Growth: मेकअप न करता भुवया नीट कशा दिसतील? वापरा या सोप्या टीप्स

Maharashtra Live News Update : धुळ्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मनुस्मृती करण्यात आले दहन

SCROLL FOR NEXT