Raigad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Crime: रायगड हादरले! कुंडलिका नदीत उडी मारून महिलेनं आयुष्य संपवलं

Raigad Police: रायगडच्या रोहामध्ये महिलेने आत्महत्या केली. या महिलेने कुंडलिका नदीत उडी मारून आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Priya More
  • रायगडच्या रोहा येथे महिलेची आत्महत्या

  • कुंडलिका नदीमध्ये महिलेने उडी मारली

  • कुंडलिका नदी परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली

  • झाडाझुडपात महिलेचा मृतदेह आढळून आला

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने रोहामधील कुंडलिका नदीत उडी मारत आयु्ष्य संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बऱ्याच तासांच्या शोध मोहिमेनंतर महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेने आत्महत्या का केली? यामागचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीत उडी मारून एका महिलने आत्महत्या केली. विनया कदम (वय ५४ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. ही महिला रोहा येथे राहणारी होती. ही महिला घरातून काहीच न सांगता बाहेर पडली. घरचे तिचा शोध घेत होते. त्यांनी रोहा पोलिस ठाण्यात धाव घेत मिसिंगची तक्रार दाखल केली होती.

या महिलेचा शोध घेत असताना पोलिसांनी प्राथमिक तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहतीनुसार या महिलेने कुंडलिका नदीमध्ये उडी मारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बचाव आणि शोध पथके, पोलिस यंत्रणांकडून कुंडलिका नदी पात्रात या महिलेचा शोध घेण्यात आला. अखेर कुंडलिका नदीतील एका झुडपात महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास रोहा पोलिस करत आहेत.

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली. पश्चिम रेल्वे मार्गावर ही घटना घडली. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे लोकलचा दरवाजा बंद कर यावरून किरकोळ वाद झाला. या वादानंतर आरोपीने २२ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली. या घटनेमुळे मुंबई हादरली आहे. मयांक लोहार (२२ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते तो विरार येथे राहत होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Storage Tips : घरात 'या' ७ ठिकाणी कधीच गोळ्या-औषधं ठेवू नका! कारण जाणून घ्या

Monday Horoscope : शंकराची कृपा राहील! 5 राशींची भरभराट होणार, पैसा खर्च करताना काळजी घ्या; वाचा सोमवारचे राशीभविष्य

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

SCROLL FOR NEXT