Mumbai-Gao Highway Traffic Jam Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai-Gao Highway Traffic Jam: मुंबई- गोवा महामार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचले त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

Priya More
  • रायगडमध्ये मुसळधार पाऊस

  • मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले

  • महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या

  • वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले

अमित गवळे, रायगड

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रायगडमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाकण आणि नागोठणेदरम्यान असलेल्या हॉटेल गुलमोहरजवळ कोलाडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच वाकण येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी देखील वैतागले आहेत

पावसामुळे आणि मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहन चालक यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. महामार्गावर तासंतास अडकून पडल्यामुळे विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे प्रवाशांना अन्न आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली. वाहनांच्या लांब रांगांमुळे वेळेचा मोठा अपव्यय झाला असून प्रशासनाने महामार्गावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून केली जात आहे.

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीला आलेल्या पूरामुळे वाकण पाली राज्य महामार्गावर वाकण आणि वजरोली गावाजवळ भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यात तब्बल २८ नागरिक अडकून पडले होते या सर्वांना रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने सुखरूप बाहेर काढले. वजरोली गावाजवळ अंबा नदीच्या किनारी काही बंगल्यांचे बांधकाम सुरू आहे. नदीचे पाणी अचानक वाढल्यामुळे या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी २० मजूर आणि नागरिक अडकून पडले होते.

दुसरीकडे, वाकण नाक्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ८ जण पुराच्या पाण्यात वेढले गेले होते. पाण्याचा वेढा इतका वेगाने वाढला की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या सर्वांना हॉटेलच्या छतावर जावे लागले. या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतानाही टीमच्या सदस्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून बचावकार्य सुरू केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हॉटेलच्या छतावरील ८ जणांना आणि बंगल्याच्या कामावरील २० जणांना असे एकूण २८ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग; जेवणानंतर मुलांना होऊ लागल्या उलट्या

शिक्षणमंत्र्याचा राजीनाम्यानंतर मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; लोकसभेत सादर मांडणार नवं विधेयक

पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचं काम कधी सुरू होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

मराठी माणसानं पुन्हा दिल्ली जिंकली, अभिजीत भिडला, दिल्लीश्वर झुकले, मराठी मोडेन पण वाकणार नाही

प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप?फडणवीस, शिंदेंना दिल्लीत बोलावणं, फडणवीस शिक्षणमंत्री होणार, राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT