Police register FIR against Minister Bharat Gogawale’s son after a violent clash between NCP and Shiv Sena workers during Mahad municipal elections. saam tv
महाराष्ट्र

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

NCP–Shiv Sena Clash : महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाविरुद्ध हल्ला, तोडफोड केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Bharat Jadhav

  • मतदानादरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

  • मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचलाय. मतदानादरम्यान झालेल्या राड्यामुळे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालाय. महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला झाला होता.

मतदानाच्या दिवशी २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले आणि त्याच्या साथीदारांनी सुशांत गणेश जाबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीची तोडफोड करण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावण्यात आले होते. याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी फरार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मतदानाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी विकास गोगावले, महेश निवृत्ती गोगावले, विजय मालसुरे, प्रशांत शेलार, वैभव (बाबू) मालसुरे, सूरज मालसुरे, सिद्धेश शेत आणि इतर ८ ते १० जणांनी त्यांना अडवलं. आरोपींनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार फिर्यादींनी दिलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष सुशांत जाभरे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यासह इतर आठ जण व एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केल्याचा आरोप केलाय. तर शिवसेनेकडूनही तक्रार दाखल करण्यात आलीय. या घटनेबाबत महाड एमआयडीसी पोलिसांकडे महेश निवृत्ती गोगावले यांनी तक्रार दिलीय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, प्रमुख गणेश जाभरे, इतर १० जण व ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krantijyoti Vidyalay: 'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सहा दिवसात गाठला ५ कोटींच्या टप्पा

Imtiyaz Jaleel Attack: माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला का झाला? रॅलीत नेमकं काय घडलं? Video

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसचे निलंबित १२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार?

Period pain relief: दर महिन्याला पेनकिलर घेणं पडू शकतं महागात; Period Pain पासून त्वरित आराम देतील हे ५ घरगुती उपाय

महाराष्ट्रातलं Switzerland! थंडीत नक्की भेट द्या मुंबई-पुण्याजवळच्या 'या' मिनी स्वित्झर्लंडला

SCROLL FOR NEXT