Mobile Blast
Mobile Blast  Saam TV
महाराष्ट्र

Raigad Mobile Blast: मुलांकडे मोबाईल देताना सावधान! रायगडमध्ये ६ वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

सिद्धेशसावंत

Mahad Ambivali News: अलीकडच्या काळात लहान मुलींना लागलेले मोबाईलचे व्यसन चिंता वाढवणारे आहे. कारण मोबाईलचा अतिवापर मुलांच्या आरोग्यास तर हानीकारक आहेच. याशिवाय मोबाईलचे स्फोट होण्याच्या घटनाही वारंवार घडताना दिसत आहेत. सध्या रायगडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ज्यामध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. महाड तालुक्यातील आंबीवली गावात ही घटना घडली आहे. या जखमी मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 27 रोजी दुपारच्या सुमारास महाड (Mahad) तालुक्यातील आंबीवली गावात घडली. अनिता दिनेश वाघमारे (6) असे या मुलीचे नाव असून या स्फोटात तिच्या तोंडाला व जबड्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. (Raigad News)

उपचारासाठी मुंबईला हलवले...

घटनेनंतर मुलीला जखमी अवस्थेत तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान, लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईलचा अतिवापर वाढला असून मोबाईलच्या आहारी जाण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. या घटनेमुळे पालक वर्गात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र मुलांच्या हातात मोबाईल देताना काळजी घेणे तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

अनेकदा पालकांचं लक्ष नसतानाही लहान मुलं मोबाईल वेगवेगळा कंटेट पाहत असतात. मात्र बऱ्याच पालकांचं मुलं मोबाईलवर नेमकं काय करतात याकडे फारसं लक्ष नसतं. त्यामुळेच अशा घटना वाढताना दिसत आहेत.. Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hairfall Tips: केस गळतीच्या समस्यांवर फॉलो करा 'हे' रामबाण उपाय

Bhandardara Fireflies Festival 2024: काजव्यांची चमचम पाहण्यास भंडारद-याला येणार आहात? जाणून घ्या नियम व अटी

IPL 2024 Playoffs: प्लेऑफ्सचे ४ संघ ठरले! कुठे, केव्हा अन् कधी होणार सामने? वाचा सविस्तर

Nashik Lok Sabha: कांद्याच्या माळा घालून काही होणार नाही, सत्याग्रह करा; छगन भुजबळांचा सल्ला

Sunil Raut News : सुनिल राऊत यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT