Jitendra Awhad Saam TV
महाराष्ट्र

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाडमध्ये २ गुन्हे दाखल

Case Register Against MLA Jitendra Awhad: महाड येथील मनुस्मृतीविरोधातील आंदोलनावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलिस ठाण्यात (Mahad City Police Station) जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडच्या क्रांती स्तंभ येथे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती विरोधातील आंदोलना दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसर, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक गुन्हा बौद्ध धर्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे. तर दूसरा गुन्हा जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिस अधिक तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या आडचणीत वाढ झाली आहे.

शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या सहभागाला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध करत आंदोलन केले. मनुस्मृतीचा निषेध करण्यासाठी आक्रमक झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत महाड येथे बुधवारी आंदोलन केले. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिऊन नंतर त्यांनी मनुस्मृतीचे दहन करत विरोध व्यक्त केला. यावेळी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो देखील फाडण्यात आले. मनुस्मृतीचे फोटो फाडत असताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो देखील फाडले गेले.

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी करत काही राजकीय नेत्यांनी त्यांना अटक करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तर काहींनी आव्हाडांनी माफी मागावी असे देखील म्हणणे व्यक्त केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती. माझ्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधाने फाडला गेल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी व्हिडीओद्वारे सर्व आंबेडकर प्रेमींची माफी देखील मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

SCROLL FOR NEXT