10th student end life In Mahad Saam Tv
महाराष्ट्र

Mahad Shocking News: वडिलांच्या शिकारी बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ला संपवले, १० वीच्या विद्यार्थ्याने का उचलले टोकाचे पाऊल?

10th student end life In Mahad: सुयशने गुरूवारी दुपारी घरामध्येच डोक्यामध्ये बंदुकीमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. डोक्यावर गोळी लागल्यामुळे सुयशचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. रायगडच्या महाडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाडच्या ताबट अळीमध्ये सुयश नगरकर (१५ वर्षे) हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. सुयश दहावीमध्ये शिकत होता. सुयशने गुरूवारी दुपारी राहत्या घरामध्येच बंदुकीमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. डोक्यावर गोळी लागल्यामुळे सुयशचा जागीच मृत्यू झाला. सुयशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुयशने वडिलांच्या शिकारीच्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केलीचे सांगितले जात आहे. ही बंदुक सध्या वापरात नव्हती. घरामध्ये सुयश रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. या घटनेची माहिती मिळताच सुयशच्या घराबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सुयशने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करत आहे. सुयशचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

Maharashtra News Live Update: पुण्यात रात्री साडे अकराच्या सुमारास कॅम्प परिसरात अपघात

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

SCROLL FOR NEXT