Bhor Mahad ghat road : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट बंद, कारण...

Bhor Mahad ghat road update : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी हाती आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट बंद, कारण...
Bhor Mahad ghat road Saam tv

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्याहून भोरमार्गे महाडला वरंध घाट मार्गाने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वरंध घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे करण्यात येत आहे. यामुळे या मार्गावरील वाहूतक बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट बंद, कारण...
Pune Breaking News: पोलिसांना गुंगारा, धावत्या ट्रेनमधून उडी टाकून आरोपी फरार; पुण्यात खळबळ

पुणे जिल्ह्यातील वरंध घाटात रस्त्याचे दुपदरीकरणे, संरक्षक भिंत बांधणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची कामं सुरू आहेत. या मार्गावरील ही कामे सुरू असताना अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव 1 एप्रिल पासून 30 मे रोजीपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट बंद, कारण...
Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

लग्नसराई, उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणूक पाहता कोकणात येणारे प्रवासी यांची हेळसांड होऊ नये यासाठी, प्रवाशांनी केलेल्या मागणीवरून महाडचे आमदार भारत गोगावले यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबतच चर्चा केली. त्यानंतर 1 मेपासून काही दिवसांकरीता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा घाटाचे कामं सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com