Bird Flu Saam tv
महाराष्ट्र

Bird Flu : बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला; रायगडमध्ये १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट, लातुरात ५० कावळ्यांचा मृत्यू

Raigad Latur news : रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे अहवालातुन समोर आले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना हि लागण झाली असून तसा अहवाल भोपाळच्या पशुरोग प्रयोग शाळेने दिला आहे

Rajesh Sonwane

सचिन कदम/ संदीप भोसले 
रायगड/ लातूर
: बर्ड फ्लूचा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. यामुळे धोका वाढला असून अनेक ठिकाणी कोंबड्यांना लागण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामध्ये रायगडमध्ये घरगुती कोंबड्यांना लागण झाली असून जिल्ह्यात आतापर्यत १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तर लातूरमध्ये आतापर्यंत ५० कावळ्यांचा मृयू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. 

रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे अहवालातुन समोर आले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना हि लागण झाली असून तसा अहवाल भोपाळच्या पशुरोग प्रयोग शाळेने दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून सतर्कता म्हणून उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून गावातील १ हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट देखील लावण्यात आली आहे.  

एक किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित 

रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. यामुळे १ किलोमिटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसरातील चिकनची दुकान ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उदगीर शहरात बर्ड फ्लूमुळे ५० कावळ्यांचा मृत्यू
लातूर
: मागच्या चार दिवसामध्ये उदगीर शहरात अनेक ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू वाढवून आला होता. अचानक जवळपास ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या कावळ्यांच्या मृत्यू बाबत अहवाल मागवण्यासाठी नमुने भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. मात्र आता हे प्रयोगशाळेतील नमुने प्राप्त झाले आहेत. यात या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतीकात्मक उपाय योजना सुरू केल्या आहेत. 

दहा किमी परिसरात अलर्ट झोन 

कावळ्याच्या मृत्यू झालेल्या परिसरात दहा किलोमीटर परिसर अलर्ट झोन करण्यात आला आहे. तर बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण आणि वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार आहेत. नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये असे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT