Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide: रायगडमधील खालापूरच्या इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने अख्ख गाव ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना घडली आहे. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना आमदार सचिन आहिर यांनी सरकारवर टीका केली आहे. इर्शाळवाडीतील लोकांना आधीच दुसरीकडे हलवलं असतं तरतर 5 जणांचा मृत्यू झाला नसता असे सचिन आहिर म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सरकारला विनंती केली होती की सतर्कतेचा इशारा द्या. या घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड हा डोंगराळ भागात आहे. तिथल्या लोकांना आधीच दुसरीकडे हलवलं असतं तर हे झालं नसतं. आम्हाला यावर राजकारण करायचं नाही. परंतु जर प्रशासन आधीच अधिक सतर्क झालं असते तर 5 जणांचा मृत्यू झाला नसता.
काल सकाळपासून सांगतोय सतर्कतेचा इशारा द्यायला हवा. तिथे स्वतः पालकमंत्री असायला हवा होता. पालकमंत्री असल्यावर काम वेगाने होते. डोंगराळ भागात फार कमी निधी दिला जातो. यात देखील राजकारण केलं जात असेल तर वाईट आहे, असे सचिन आहिर म्हणाले.
ते म्हणाले की, या भागासाठी केंद्र आणि राज्याने विशेष निधीची तरतूद करायला हवी. त्या भागात रस्ते नाहीत. खालापूरमध्ये रुग्णालय नाही. तेथील लोकांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात आणलं जात आहे, असे देखील त्यांनी सांगितले. (Raigad Khalapur Irshalgad Landslide)
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी - बाळासाहेब थोरात
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीत दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याचे व अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून त्यांना योग्य उपचार देण्याला प्राथमिकता दिली पाहिजे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च सरकारने करावा. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.