Rescue teams recover the body of a young trekker from a deep valley at Irshalgad in Raigad after a tragic fall during a solo trek. saam tv
महाराष्ट्र

रायगडमध्ये ट्रेकिंगदरम्यान मोठी दुर्घटना; इर्शाळगडाच्या दरीत पडून तरुणाचा मृत्यू

Irshalgad Trekking Accident Latest News: रायगडमधील इर्शाळगडावर ट्रेकिंग करताना भिवंडीतील 26 वर्षीय तरुणाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोलो ट्रेकदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे ट्रेकर्समध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Omkar Sonawane

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड: निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका तरुण पर्यटकाचा रायगडमधील प्रसिद्ध इर्शाळगडावर दरीत पडून मृत्यू झाला आकाश वाघमोडे (वय 26, रा. भिवंडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सोलो ट्रेकिंगसाठी गेलेला आकाश बेपत्ता झाल्यानंतर सोमवारी त्याचे पार्थिव दरीत सापडले.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील आकाश वाघमोडे हा तरुण काल खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील इर्शाळगडावर एकटाच ट्रेकिंग करण्यासाठी आला होता. गडावर चढत असताना त्याचा पाय घसरला किंवा इतर कोणत्यातरी कारणाने त्याचा तोल जाऊन तो थेट खोल दरीत कोसळला.

आकाश घरी न परतल्यामुळे आणि त्याचा संपर्क होऊ न शकल्यामुळे शोध सुरू करण्यात आला. त्याची मोटारसायकल इर्शाळगडाच्या पायथ्याशी पार्क केलेली आढळल्याने तो गडावरच असल्याची खात्री झाली. त्यानंतर खालापुर पोलीस आणि खोपोली हेल्प फाऊंडेशनच्या पथकाने आज सकाळी तातडीने शोधकार्य हाती घेतले.

अत्यंत अवघड असलेल्या इर्शाळगडाच्या दरीमध्ये शोध घेत असताना मदत पथकाला आकाशचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास करत आहे. एका उमद्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने भिवंडी परिसरात आणि ट्रेकर्समध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव; युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होणार की तणाव वाढणार?

नसरापूर घटनेचा SIT करणार तपास; नराधमाला फाशी द्या, नागरिकांची मागणी

Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

Maharashtra News Live Update: राजूर घाटात भीषण वनवा; अजिंठा पर्वतरांगेतील जंगलाला आग

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT