Fort In Nashik : सह्याद्रीतील सर्वात थरारक ट्रेकिंग स्पॉट, 'हा' किल्ला पाहताच हृदयाचा ठोका चुकेल

Shreya Maskar

मदनगड किल्ला

मदनगड किल्ला हा थरारक ट्रेकिंग स्पॉट आहे. मदनगड महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील कळसूबाई रांगेत वसलेला एक आव्हानात्मक किल्ला आहे.

Madangad Fort | google

अलंग-मदन-कुलंग

मदनगड किल्ला हा नाशिकमधील प्रसिद्ध 'AMK' (अलंग-मदन-कुलंग) ट्रेकिंग रांगेचा एक भाग आहे. ट्रेकिंग करताना सह्याद्रीच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेता येतो.

Madangad Fort | google

किल्ल्याचा थरार

६० फुटांची उभी कातळचढाई, अरुंद आणि उघडा कडा हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. या किल्ल्याला भेट देताना तुम्ही नक्की 100 वेळा विचार करा.

Madangad Fort | google

किल्ल्यावर काय काय आहे?

मदनगड किल्ल्यावर गेल्यावर प्राचीन पाण्याची टाकी, दुर्गम व खडकाळ प्रदेश आणि सभोवतालचे 'कळसूबाई वन्यजीव अभयारण्य' ही येथील काही प्रमुख आकर्षणे आहेत.

Madangad Fort | google

अभयारण्य

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कळसूबाई वन्यजीव अभयारण्य अभयारण्य रानगवा, बिबट्या, जायंट स्क्विरेल आणि दुर्मिळ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Sanctuary | google

ट्रेकिंग

पायथ्यापासून गडावर चढण्यासाठी साधारणपणे ३ ते ४ तास लागतात. या मार्गावर ४० फुटांची खडकाळ चढाई करावी लागते; त्यानंतर एका अरुंद आणि तीव्र उताराच्या कडेवरून चालत गडाच्या माथ्यावर पोहोचता येते.

Trek | yandex

कधी जावे?

पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू गडाला भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे. मात्र कडाक्याच्या उन्हात आणि मुसळधार पावसात येथे जाणे टाळा.

monsoon | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Madangad Fort | google

NEXT : कोकणात गर्दीपासून दूर लपलेले निसर्गसौंदर्य, 'हा' समुद्रकिनारा उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Hidden Beach In konkan | saam tv
येथे क्लिक करा...