Hidden Beach In konkan : कोकणात गर्दीपासून दूर लपलेले निसर्गसौंदर्य, 'हा' समुद्रकिनारा उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Shreya Maskar

तांबळडेग बीच

तांबळडेग समुद्रकिनारा हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यात वसलेला एक शांत, निसर्गरम्य आणि कमी गर्दी असलेला समुद्रकिनारा आहे.

Tambaldeg Beach | yandex

गजबादेवी मंदिर

तांबळडेग समुद्रकिनारा कोकणातील प्रसिद्ध गजबादेवी मंदिराच्या सान्निध्यात वसलेला आहे. येथे निसर्गाची शांतता अनुभवता येते. येथे स्वच्छ शुभ्र वाळू पाहायला मिळते.

Temple | google

पर्यटन स्थळे

तांबळडेग समुद्रकिनाऱ्याजवळ देवगड समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर यांसारखी पर्यटन स्थळे आहेत.

Tambaldeg Beach | google

कासव संवर्धन

तांबळडेग बीचवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवांच्या संवर्धनाचे प्रयत्न केले जातात.

Turtle | google

कोकणी खाद्यसंस्कृती

तांबळडेग समुद्रकिनाऱ्याजवळ कोकणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मिळतो. येथे राहण्याची, खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.

Konkani Cuisine | yandex

कसं जाल?

तांबळडेग बीच जवळ कणकवली रेल्‍वे स्टेशन आहे. त्यामुळे तुम्ही स्टेशनला उतरून रिक्षाने समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाऊ शकता.

Kankavli | google

वॉटर स्पोर्ट्स

तांबळडेग बीचवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. तसेच तुम्ही येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.

Water Sports | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Tambaldeg Beach | google

NEXT : नाशिकला गेलाय? 'हे' आहे निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट वीकेंड गेटवे लोकेशन, उन्हाळ्यात घ्या थंडगार हवा

Nashik Travel | saam tv
येथे क्लिक करा...