Karjat News Saam TV
महाराष्ट्र

Karjat News : शस्त्रक्रियेदरम्यान १६ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी कर्जतच्या रायगड रुग्णालयात केली तोडफोड

Nerul Raigad Hospital : शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने मुलाचा मृत्यू झालाय, असा दावा त्याचे नातेवाईक करत आहेत. रोहीत गवळी असं मृत १६ वर्षीय मृत मुलाचं नाव आहे.

Ruchika Jadhav

सचिन कदम

Karjat News :

कर्जतमधील नेरळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु असताना मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतापले आहेत. संतप्त नातेवाईकांनी थेट येथील रुग्णालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केलीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेरळमधील रायगड हॉस्‍पीटलमध्ये एक १६ वर्षीय मुलगा अॅडमीट होता. आजारी असल्याने त्याच्यावर एक शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने मुलाचा मृत्यू झालाय, असा दावा त्याचे नातेवाईक करत आहेत.

रोहीत गवळी असं मृत १६ वर्षीय मृत मुलाचं नाव आहे. तो कर्जत तालुक्‍यातील मानिवली येथील रहिवासी होती. मुलाच्या मृत्यूनंतर मंगळवारी रात्री नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. संतप्त नातेवाईकांनी संगणक तसेच खिडक्‍यांचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे.

पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना समज दिली. पोलिसाच्या हस्‍तक्षेपानंतर सध्‍या वातावरण शांत आहे.

रोहीतचा मृतदेह शवविच्‍छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रूग्‍णालयात पाठवण्‍यात आला आहे. तेथील अहवाल आल्‍यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे पोलीसांकडून सांगण्‍यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT