SUDHAGAD HEAVY RAINFALL: AMBA RIVER FLOODING HALTS TRAFFIC, CROPS DAMAGED IN RAIGAD Saam Tv
महाराष्ट्र

Raigad : मुसळधार पावसाचा कहर! वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; नागरिकांचे हाल

Raigad News : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अंबा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे पाली-खोपोली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून शेतांचे मोठे नुकसान झाले आहे.

Alisha Khedekar

  • सुधागड तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  • पाली-खोपोली महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद

  • अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान

अमित गवळे, रायगड

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. विशेषतः वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पुलाच्या जोडरस्त्यावर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाकण आणि खोपोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स उभारून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद केली. अंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने भेरव येथील पुलावरूनही पाणी वाहत होते. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूकही काही काळासाठी थांबवण्यात आली. दरम्यान, वाकण-पाली मार्गावरील वाकण नाक्याजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. तसेच आवंढे गावाजवळील साकव पाण्याखाली गेल्याने काही भागांचा संपर्क तुटला होता. ढोकळेवाडी परिसरात रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत झाड हटवून मार्ग मोकळा केला.

या अतिवृष्टीचा फटका शेतीलाही बसला आहे. अंबा नदी पुलाजवळील शेतांमध्ये पाणी शिरल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले. शेतकरी तुषार ठोंबरे यांचे सौरऊर्जा प्रकल्पातील सौर पॅनल पाण्यात बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वावे गावाजवळील नाला तुंबल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. यामुळे दुचाकी घसरणे तसेच चारचाकी वाहने अडकण्याच्या घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ग्रामस्थ केतन म्हसके यांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. प्रकाश पालरेचा यांनी जेसीबीसह पथक घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि नाल्याची साफसफाई सुरू केली. या मोहिमेत निखिल शिंदे, निलेश सकपाळ, सीताराम म्हसके आणि उमेश म्हसके यांसह अनेक ग्रामस्थांनी श्रमदान करत सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे नाल्यातील अडथळे दूर झाले, रस्त्यावरील पाणी ओसरले आणि संभाव्य मोठा अपघात टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT