Raigad Earthquake 
महाराष्ट्र

Earthquake : रायगडमध्ये रात्री भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावपळ

Raigad Earthquake : बुधवारी रात्री साडेदहा वाजता रायगडमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. लोकांनी घराबाहेर पळ काढला होता. काही वेळासाठी दहशतीचे वातावऱण होतं.

Namdeo Kumbhar

सचिन कदम

Raigad Experiences Nighttime Earthquake : रायगड जिल्ह्याला बुधवारी रात्री भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाची तीव्रता सौम्य असली तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडिया व्हायरल झाले आहेत. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला अन् तेचा केंद्रबिंदु कोणता होता? याबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही. रात्री लोक झोपेत असतानाच अचानक रायगड जिल्ह्यात भूकंपाचे हादरले जाणवले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागली, खिडक्या,काचा हादरू लागल्या, त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात पेण आणि सुधागड तालुक्यात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पेण तालुक्यातील तिलोरे, वरवणे आणि सुधागड तालुक्यातील महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसले. भूकंपाचे हादरले जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. त्यामुळे रायगडमधील बऱ्याच दावात रस्त्यांवर अचानक मोठी गर्दी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास रायगडमधील पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे हादरले जाणवले. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांची गावांना भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करून धीर दिला.

पेण आणि सुधागडमध्ये जमिनीला हादरे बसून भू गर्भातून आवाज आला, घरातील भांडी हलली, इतर कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पण अचानक आलेल्या भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेत स्थळावर याची नोंद नाही. जिओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

SCROLL FOR NEXT