Raigad Crime Saam tv
महाराष्ट्र

Raigad Crime : रायगडमध्ये दीड कोटीच्या दरोड्याचा बनाव; दोन पोलिसांचाही सहभाग

Raigad News : रायगडमध्ये काही दिवसांपूर्वी सात किलो सोन स्वस्तात देण्याचे सांगत दीड कोटी रुपयात फसवणूक झाल्याची घटनेप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करत दीड कोटी रुपयांची लुबाडणूक झाल्याचे सांगण्यात आले होते

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: रायगडमध्ये स्वस्तात सोनं देतो असे सांगून व्यापाऱ्याला लुबाडणूक करण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र पोलीस तपासात या घटनेचे सत्य समोर आले असून दीड कोटी रुपयांचा झालेल्या दरोड्याचा बनाव करण्यात आला होता. तर या प्रकरणात चक्क दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

रायगडमध्ये काही दिवसांपूर्वी सात किलो सोन स्वस्तात देण्याचे सांगत साधारण दीड कोटी रुपयात फसवणूक झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करत दीड कोटी रुपयांची लुबाडणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु करण्यात आल्या. या तपासात घटनेचे सत्य समोर आले आहे. 

असा करण्यात आला होता बनाव 

दरम्यान या घटनेत सात किलो सोनं स्वस्तात देण्याचे सांगण्यात आले होते. तर ५ कोटी रूपयांच्या सौद्यापोटी दीड कोटी रुपये घेऊन फिर्यादी अलिबागला येत असताना तिनवीरा येथे पोलिस तपासणीचे नाटक करण्यात आले. यावेळी पोलीस आले म्हणून पळापळ सुरू होताच व्यापाऱ्याचे दीड कोटी रूपये लंपास करून दोघे फरार झाल्याचे सांगण्यात आले होते. 

दोन पोलिसांचा सहभाग 

दिड कोटीच्या दरोड्यात चक्क दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. स्वस्तात सोनं देतो असे सांगून एका टोळीने व्यापाऱ्याला लुटल. या गुन्ह्याचा तपास करीत असताना दरोड्याच्या गुन्ह्यात रायगड पोलिस दलातील दोन कर्मचारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासाअंती दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

SCROLL FOR NEXT