Onion Price : कांदा उत्पादकांना दिलासा; लासलगावमध्ये सरासरी अडीच हजाराचा मिळतोय दर

Nashik News : सर्वच बाजार समितीमध्ये आवक कमी झाली मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून फारशी आवक नसल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत
Onion Price
Onion PriceSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मागील काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात घसरण सुरु होती. यात कांदा १६०० ते १८०० रुपयांवर खाली गेला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यात वाढ होत असून आज तो सरासरी २५०० रुपयांवर पोहचला आहे. कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने कांडा उत्पादक शेतकरी सुखावला आहे. आगामी काळात कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

आशिया खंडातील सर्वात मोठी नाशिकच्या लासलगाव येथिल बाजार पेठेत आज कांद्याला जास्तीत जास्त २ हजार ८९१ तर सरासरी २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला आहे. सध्या लाल कांद्याची जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये आवक कमी झाली आहे. मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून फारशी आवक नसल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Onion Price
Nashik Crime : नात्यातील मुलीवर जडले प्रेम; एकटीला गाठत केले भयानक कृत्य, मुलीची प्रकृती चिंताजनक

लासलगावमध्ये सर्वाधिक भाव 

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील बाजारपेठ सर्वात मोठी मानली जाते. लासलगावमध्ये कांद्याला सध्या २ हजार ५०० रुपये क्विंटलचा सरासरी दर मिळत आहे. हा दर इतर बाजारपेठांच्या तुलनेत अधिक आहे. कारण जिल्ह्यातील अन्य ठिकाणी मात्र २ हजार ३०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शेतकरी देखील लासलगाव येथे कांडा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात कांदा आणत आहेत. 

Onion Price
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कांदा काढणीला सुरवात झाल्यानंतर आवक वाढू लागली होती. यानंतर कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत होते. मागील महिन्यात हे दर दोन हजाराहून खाली गेले होते. तर पंधरा दिवसांपूर्वी हेच दर २४०० रुपयांवर स्थिरावले होते. मात्र आता दरात पुन्हा वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत असून सरासरी दर अडीच हजरांवर पोहचले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com